डाॅ. बाबासाहेबांच्या वैचारीक क्रांतीचा, शिकवणुकीचा अंगीकार

 








डाॅ. बाबासाहेबांच्या वैचारीक क्रांतीचा, शिकवणुकीचा अंगीकार

◾हिच या महामानवास खरी आदरांजली - हंसराज अहीर



चंद्रपूर/यवतमाळ ( राज्य रिपोर्टर ) : वैश्विक कीर्तीचे महामानव भारतरत्न डाॅ. बाबसाहेब आंबेडकर समतेचे उपासक होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य समता प्रस्थापित करण्यास व विषमता नष्ट करण्यासाठी घालविले.  बाबासाहेबांचे भारतीय जनतेवर फार मोठे ऋण आहे त्यांच्या या ऋणांची आपण उभ्या आयुष्यात परतफेड करू शकत नसलो तरी त्यांच्या वैचारीक क्रांतीचा, मानवतेच्या शिकवणुकीचा व त्यांच्या जिवन घडविणाऱ्या विचारधारेचा काही अंशी अंगीकार करू शकलो तर बाबासाहेबांप्रती हिच खरी आदरांजली ठरेल असे भावोद्गार पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बाबासाहेबांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित आदरांजली कार्यक्रमात बोलतांना काढले. 


भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा महानगर  च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात दि. 14 एप्रिल रोजी आयोजित आदरांजली सभेस महाराष्ट्र लोकलेखा समिती अध्यक्ष तथा पूर्व वित्तमंत्राी आ. सुधीर मुनगंटीवार महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, पूर्व महापौर अंजली घोटेकर, पूर्व उपमहपौर अनिल फुलझेले, ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, रवि गुरनुले, सुभाष कासनगोट्टुवार, ब्रिजभुषण पाझारे, राहुल घोटेकर, सविता कांबळे, वंदना जांभुळकर, जयश्री जुमडे, पुष्पा उराडे, रेणुका घोडेस्वार आदी मान्यवर या आदरांजली सभेस प्रामुख्याने उपस्थित होते. 

महामानवास भावपूर्ण आदरांजली वाहतांना हंसराज अहीर म्हणाले की, बाबासाहेबांचा जन्मदिवस हा अख्ख्या भारवर्षाकरीता मोठा सन आहे. माझासारख्या असंख्यांना, मागासल्या वर्गातील लोकांना बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने राजकीय पटलावर वावरण्याची संधी दिली. त्यांनी दिलेल्या घटनेने भारतीय लोकशाही बळकट झाली. ते या देशाचे, समाजाचे मार्गदर्शंक होते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा घेवून चालण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. भाजपा राजवटीत भारतरत्न उपाधीने त्यांना सन्मानीत करण्यात आले. मात्रा ही चुक सुधारण्यास बराच उशीर झाला ही खंत आजही जनसामान्यांच्या मनास अस्वस्थ करते. अशा महान प्रकांडपंडीतास अभिवादन करून त्यांच्या स्मृतिस नमन करतो अशा भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी अनेक मान्यवरांनी डाॅ. बाबसाहेबांच्या जिवनचरीत्रावर विचार व्यक्त करून त्यांना अभिवादन केले. या अभिवादन सोहळ्यास  विठ्ठलराव डुकरे, दिनकर सोमलकर, संजय कंचर्लावार, राजेंद्र खांडेकर, संगीता खांडेकर, राजु गोलीवार, रवि धारणे,रवि लोणकर, सचिन कोतपल्लीवार, शाम कनकम, खुशबु चैधरी, राजु घरोटे, विनोद शेरकी, शितल गुरनुले, विशाल निंबाळकर, अरूण तिखे, राजु अडपेवार, शिला चव्हाण, धनराज कोवे, चंद्रकांत गौरकर,डाॅ. भट्टाचार्य, वंदना संतोषवार, मनोरंजन राॅय, गौतम यादव, पूनम तिवारी, संदीप देशपांडे, किरण बुटले, स्वप्नील मुन, राहुल सुर्यवंशी यांचेसह भाजपा पदाधिकारी, व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments