राज्यभरात तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे आंदोलन

 




राज्यभरात  तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे आंदोलन

🔸प्रलंबित मागण्यांची अद्याप पुर्तता नाही !

🔸राज्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार वर्गांत उमटला नाराजीचा सुर ! 

🔸संघटनेचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समाेर काळ्याफिती लावून धरणे आंदोलन ! 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरांवर तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या रास्त मागण्या प्रलंबित असून शासनाने त्यांच्या मागण्यांची अद्याप दखल घेतली नसल्याचे एकंदरीत दिसुन येते. याच मागण्यांच्या पुर्ततेसाठी उपरोक्त तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने राज्यभर दि.३०मार्चपासून टप्प्या टप्प्याने आंदाेलनाची सुरुवात करण्यांत आली असून याच आंदाेलनाचा एक भाग म्हणून आज शुक्रवार दि. १ एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्याधिकारी कार्यालया समाेर तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी काळ्याफिती लावून निदर्शने केली. दरम्यान संघटनेच्या प्रलंबित  मागण्यांची पुर्तता झाली नाही तर येत्या ४ एप्रिल पासून काम आंदोलन करण्याचा इशारा याच संघटनेनी दिला आहे. दरम्यान आजच्या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड, राजूराचे तहसीलदार हरीष गाडे, बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, गाेंडपिपरीचे तहसीलदार के .डी.मेश्राम, भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत साेनवाने, सहा जिल्हा पुरवठा अधिकारी मॅचेवार, श्री.गांगुर्डे,नायब तहसीलदार राजू धांडे, डाँ. जितेन्द्र गादेवार,नायब तहसीलदार डाँ.सचिन खंडाळे, गीता उत्तरवार, यांनी आपला सहभाग नाेंदविला. राज्यभरात आज तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे आंदोलन झाले असल्याचे व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे. या संघटनेच्या एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे एक निवेदन सादर केले या वेळी जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित हाेते.


Post a Comment

0 Comments