शैक्षणिक फी न भरल्यामुळे खाजगी शाळा विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या तक्रारीत वाढ
◾अनेक विद्यार्थ्यांना फी अभावी वर्गाबाहेर ठेवल्याचा तक्रारी
◾बल्लारपूरातील गुरु नानक पब्लिक स्कूलचा प्रताप शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करा - राजु झोडे
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील खाजगी शाळा असलेल्या गुरूनानक पब्लिक स्कूल बल्लारपूरच्या व्यवस्थापकांनी व मुख्याध्यापिका यांनी कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर ठेवून परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार करत आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय व गंभीर असून सदर शाळेवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे याकरिता वंचितचे नेते राजू झोडे व पीडित पालकांनी प्रशासनाकडे तक्रार केली.
कोरोनाच्या काळात सर्वच शाळा बंद होत्या अशातच विद्यार्थी सुद्धा दोन वर्ष शाळेत गेलेली नव्हती. परंतु खाजगी शिक्षण संस्थेतील शाळांनी ऑनलाईनच्या नावाने पैसे वसूल करण्याचे काम पालकांकडून केले. काही पालक वर्गांची कोरोनाच्या काळात अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. त्यामुळे शैक्षणिक शुल्क भरणे पालकांना कठीण झाले होते.अशातच आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या एप्रिल महिन्यात परीक्षा सुरू झाल्या आहेत. परंतु आजपर्यंतचे कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क भरणार नाही तेव्हापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिल्या जाणार नाही म्हणून शाळेतील गुरुनानक पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देता वर्गाबाहेर ठेवले. त्यामुळे पालकांनी वंचीतचे नेते राजू झोडे यांच्यासोबत शालेय प्रशासनाला विचारणा केली असता अरेरावीची व उद्धट भाषा बोलून जेव्हापर्यंत शैक्षणिक शुल्क भरणार नाही तेव्हापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही अशी मुजोरी चि अर्वाच्च भाषा वापरली. याविरोधात राजू झोडे यांच्या नेतृत्वात पालकांनी प्रशासनाकडे संबंधित शाळेवर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना व पालकांना न्याय मिळवून द्यावा करिता निवेदन देण्यात आले.
वरील मागणी मान्य न झाल्यास या विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करून आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला. निवेदन देताना वंचित चे नेते राजू झोडे, विजय बन्सोड , हरेन्द्र कुमार बुजाडे, प्रमोद गहलोत, विक्रम कॅगवार, भगतसिंह झगड़ा,नरेश डेंगरे, प्रदीप झामरे,,विलाश आमटे, पंचशील तामगाडगे,जाकिर खान तथा अन्य पालक वर्ग उपस्थित होते.
0 Comments