भद्रावती येथे मुंडके शिर नसलेल्या मृत महिलेची स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांना ओळख पटवण्यात आले यश

 







भद्रावती येथे मुंडके शिर नसलेल्या मृत महिलेची स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांना ओळख पटवण्यात आले यश

◾भद्रावती हत्या प्रकरण मैत्रिणीनेच केला घात, वारंवार होणारा अपमान सहन न झाल्यामुळे मैत्रिणीने एका मित्राच्या माध्यमातून केली हत्या

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )आठवड्यापूर्वी भद्रावती शहराच्या लगत ओसाड जागी या युवतीचे शीर कापलेले शव आढळले होते. या निर्घृण हत्येने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्याच शीर बेपत्ता असलेल्या विवस्त्र अवस्थेतील युवतीच्या शवाचे कोडे अखेर उलगडले आहे. एकाच रूममध्ये वास्तव्याला असलेल्या दोन मैत्रिणींमधील असूयेतून ही हत्या झाल्याचा दावा चंद्रपूर पोलिसांनी केला आहे.दिनांक 4  एप्रिल 2022  रोजी पहाटे दरम्यान पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीतील भद्रावती, तेलवासा रोड मायक्रोन शाळे मागील पडीत शेत शिवारात अंदाजे 20 ते 22 वर्षीय युवती मूर्त वस्तीत निर्वस्त्र स्थितीत मिळून आली होती तिची  शरीराला मुंडके ( शिर ) नव्हते. कोणीतरी अज्ञात इसमाने सदर युवतीच्या खून करून तिचे ओळख पटू नये म्हणून तिचे मुंडके शरीरापासुन वेगळे करुन तिचे मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत ठेवले. यावरुन पोलिस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमांविरुध्द अपराध क्रमांक १४१/२०२२ कलम ३०२,२०१ भादंविचा गुन्हा नोंदविण्यात आला.

 सदर घटनास्थाळी मा. पोलीस अधीक्षक श्री.अरविंद साळवे, अपर पोलिस अधिक्षक श्री.अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ भेट देवुन मृतदेहाचे व परिसराची पाहणी केली मृतदेह निर्जनस्थळी मुंडके नसलेल्या नग्न अवस्थेत होता आरोपीने मयताची ओळख पटू नये म्हणून तिची शिर कापुन नेले तसेच कपड़े सुध्दा काढुन घेवुन खेला. आशा अवस्थेत कोणत्याही प्रकारचे पुरावे/खुणा/निशानी नसल्यामुळे सदर मृत महिलेची ओळख पटविणे पोलीसांना आव्हाण होते.

घटनास्थळी कुठलाच पुरावा अथवा युवतीची ओळख पटविणारी बाब आढळून आली नाही. त्यामुळे तपास यंत्रणा दीर्घकाळ प्रयत्नशील होत्या. पोलिसांची सायबर शाखा यासाठी अहोरात्र काम करत होती. त्यातून मुलगी नागपूरजवळ रामटेक येथील रहिवासी असून, कुटुंबापासून वेगळी राहत असल्याने तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नव्हती. घटनेच्या दिवशी आरोपींनी या निर्जन ठिकाणी युवतीला दुचाकीवर घेऊन जात भांडण उकरून काढत धारदार शस्त्राने तिची हत्या केल्याचे उघड झाले. पुरावा मिळू नये, यासाठी तिला विवस्त्र करून डोके धडावेगळे करत सर्व वस्तू मोबाईल देखील नाहीसे केले. पोलिसांनी सायबर शाखेच्या तांत्रिक तपासात पुढे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला अटक केली गेली. मयत मुलगी या अल्पवयीन मुलीला सतत अपमानित करत होती, अशी माहिती पुढे आली आहे. यातील दुसरा पुरुष आरोपी निष्पन्न झाला असून, हा आरोपी मात्र अद्याप फरार आहे. मयत मुलीचे शीर अद्याप गवसले नसल्याने पोलिस तपास अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हत्या प्रकरणाचे अनेक कंगोरे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, पोलीस महत्वाचे दुवे जोडून काढत पुढील तपास मयत मृतदेहाचे ओळख पाठवण्याचे कामगिरी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सापोनि जितेंद्र बोबडे,सपोनि संदीप कापडे, पोउपनि अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार व सायबर सेल चे सायबर एक्सपटं मुजावर अली,वैभव पत्तीवार, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे व उमेश रोडे यांनी केली.



Post a Comment

0 Comments