आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी 5 कोटी रुपये मंजूर

 



आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी 5 कोटी रुपये मंजूर

◾दोन कोटी रुपयातुन होणार बाबुपेठ स्मशान भुमिचा विकास, तर चंद्रपूरच्या प्रवेश मार्गांवर बनणार भव्य प्रवेशद्वार

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर महानगरपालिके अंतर्गत येणा-या क्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. सदर मागणीला यश आले असून महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने 5 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यात बाबुपेठ येथील स्मशानभुमीच्या विकासकामाचाही समावेश आहे.

   चंद्रपूर मतदार संघातील विकासकामांसाठी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. कोरोनाच्या काळात अपेक्षित असा निधी उपलब्ध झाला नसला तरी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाची गती कमी झालेली नाही. विविध विभागाअंतर्गत चंद्रपूर मतदार संघासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठा निधी खेचून आणला आहे. या निधीतून अनेक विकासकामे केल्या जात आहे. तर यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहे. दरम्याण चंद्रपूर महानगरपालिके अंतर्गत येणा-या क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास करता यावा या करिता निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावाही सुरु होता. त्यांच्या याच पाठपूराव्याला आज यश आले असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभुत सोई सुविधांचा विकास निधी अंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतील 2 कोटी रुपये बाबूपेठ येथील स्मशान भुमिच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. 

     सदर स्मशानभुमीचा विकास व्हावा अशी येथील नागरिकांची फार जुनी मागणी होती. त्यामुळे ही मागणी पूर्ण व्हावी या करिता आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनस्तरावर प्रयत्न सुरु केले होते. आज मंजुर झालेल्या निधीत सदर कामाचाही समावेश असल्याने बाबूपेठ येथील नागरिकांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे. तर 20 लक्ष रुपयातुन जटपूरा गेट येथील व्यायम शाळेच्या जागेवर शेडचे बांधकाम, एक कोटी रुपयातुन चंद्रपूर शहरात येणा-या मुख्य तिनही रस्त्यांवर भव्य प्रवेशद्वार, 80 लक्ष रुपयातून मराठी पत्रकार संघाच्या जागेवर समाज भवनाचे बांधकाम, तर जगन्नाथ बाबा मठ येथे सामाजिक भवण आणि प्रवेश द्वारच्या बांधकामा करिता एक कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे. सदर सर्व कामांमुळे चंद्रपूरच्या विकासात मोठी भर पडणार आहे.

Post a Comment

0 Comments