महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई चे 2 रे विदर्भ स्तरीय अधिवेशन नागपुरात संपन्न : अनेक मान्यवरांची उपस्थिती

 




महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई चे 2 रे विदर्भ स्तरीय अधिवेशन नागपुरात संपन्न : अनेक मान्यवरांची उपस्थिती 

◾"मूकनायक " वृत्तपत्राने दलित, शोषित, वंचित, पीडितांच्या प्रश्नांना वाचा फोडली, लोकशाही चा चवथा स्तंभ म्हणून पत्रकारिता होय - मा., वसंत मुंडे 


नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या वतीने 2 रे विदर्भ स्तरीय अधिवेशन काल नागपुरच्या वनामती सभागृह, धरमपेठ या ठिकाणी पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे तर स्वागताध्यक्ष मा. श्रीकृष्ण चांडक मंचावर उपस्थित होते यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार विलास मुत्तेमवार,  आ. राजु पारवे, उमरेड, मा. विश्वासराव आरोटे, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, मा श्रीपाद अपराजित, संपादक दैनिक महाराष्ट्र टाईम्स, मा. भास्कर लोंढे, संपादक दैनिक लोकशाही वार्ता, मा. सुदर्शन चक्रधर, संपादक दैनिक राष्ट्रप्रकाश ई ची विचारपीठावर उपस्थिती होती यावेळी सदर अधिवेशन  2 सत्रात पार पडले यावेळी बोलतांना राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. वसंत मुंडे म्हणालेत की कोरोनाच्या संक्रमण काळात आपल्या पत्रकार संघाने उत्तम कार्य केले तळागाळात असलेल्या माणसा पर्यंत पोहोचून मदतकार्य राबविले प्रसंगी 150 हुन अधिक पत्रकारांना आपल्या प्राणालाही मुकावे लागलें, सध्याचं युग हे डिजिटल माध्यमांचं असलं तरी प्रिंट मिडिया किंवा वृत्तपत्रांचं महत्व आजही अधोरेखित आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये 1 आन्या पासून वृत्तपत्रं विक्रीला सुरुवात केली. तर "मूकनायक" च्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, शोषित, पीडितांच्या, अन्यायाला वाचा फोडण्याचं कार्य केले. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात वृत्तपत्राचे अर्थकारण या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा. महेश पानसे तर आभार प्रदर्शन राहुल मैंद यांनी केले विशेष म्हणजे विदर्भ स्तरीय अधिवेशनाला विदर्भाच्या अनेक जिल्ह्यासह लातूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्हातील पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती.

Post a Comment

0 Comments