चंद्रपूर जिल्ह्यात दि. 21एप्रिल ते 30 एप्रिल 2022 चे रात्री12 वाजेपर्यंत कलम 37(1) व (3) लागू

 



चंद्रपूर जिल्ह्यात दि. 21एप्रिल ते 30 एप्रिल 2022 चे रात्री12 ाजेपर्यंत कलम 37(1)  (3) लागू

◾जिल्ह्यात कायदा  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )जिल्ह्यात राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे आंदोलन,एसटी कर्मचारी संप, जातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलन, निदर्शने, मोर्चा, अतिमहत्वाचे ्यक्तीचा दौरा तसेच दिनांक 25 एप्रिलपर्यंत शहरात सुरु असलेली माता महाकाली यात्रा  व त्यानिमित्याने विविध कार्यक्रम, आंदोलने, निदर्शने  व यात्रा कार्यक्रमामुळे कायदा  सुव ्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात दि. 21 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 चे रात्री 12 ाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)  (3) लागू करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

या कालावधीत कायदा  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने  िवक्षित कृतींना मनाई करणे  व्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तरी, सदर कालावधीत कोणतीही ्यक्ती शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी ापरता येईल अशी इतर कोणतीही स्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, ्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, ाद्य ाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा स्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात येत आहे.

तहसिलदार तथा, तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव  मिरवणुका काढू नये. पाच किंवा त्यापेक्षा जास्त ्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. याची नोंद घ्यावी. सदर आदेश दि. 21 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 चे रात्री 12 ाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

Post a Comment

0 Comments