कोविड-19 मुळे मृत्यु मुखी पडलेल्या नगर परिषद कर्मचारी चा वारसदाराना पन्नास लक्ष रुपया चा धनादेश वाटप

 



कोविड-19 मुळे मृत्यु मुखी पडलेल्या नगर परिषद कर्मचारी चा वारसदाराना पन्नास लक्ष  रुपया चा धनादेश वाटप

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : नगर परिषद राजूरा मध्ये कार्यरत कर्मचारी श्री. सुधाकर शंकर कोंडावार  हे कोविड-19 कोरोना साथ रोगामध्ये   कर्तव्यवर कार्यरत असताना  त्यांचा  कोरोना साथ रोगा मुळे  दिनांक 2/5/2021 ला मृत्यू झाल्याने त्यांच्या पात्र वारसांना  महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग तर्फे रुपये पन्नास लक्ष्य  सानुग्रह सहायक अनुदान मंजूर करण्यात आले आहे,  नगरपरिषद सभागृहात  त्यांची पत्नी  श्रीमती संध्या सुधाकर कोंडावार यांना रुपए पन्नास लक्ष्य रुपया चा धनादेश  नगर परिषद राजुरा चे  प्रशासक तथा मुख्य अधिकारी श्री. सूर्यकांत पिदूरकर  यांचे  शुभ हस्ते देण्यात आला.

  सदर कार्यक्रमास  नगर परिषद चे माझी  अध्यक्ष श्री. अरुण भाऊ धोटे ,  माझी उपाध्यक्ष श्री. सुनील भाऊ देशपांडे माझी बांधकाम सभापति आनंद दासरी श्री. साईंनाथ बतकमवार  अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना व सदस्य उपस्थित होते तसेच नगर परिषद कर्मचारी विजय कुमार जांभुलकर प्रशासकीय अधिकारी ,श्री.  अभिनंदन काळे, श्री. संकेत नंदवंशी पानी पुरवठा अभियंता श्री.अश्विन कुमार भोई लेखापाल ,श्री. ज्ञानेश सोनवाने संगणक अभियंता, श्री. अक्षय सूर्यवंशी मिळकत व्यवस्थापक, श्री. सतीश देशमुख ,श्री. वीरेंद्र धोटे,श्री .संजय जोशी, श्री. मनोज राजगडे, श्री. बाबूराव गोगुलवार व इतर  कर्मचारी या कार्यक्रमास आज उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments