बल्लारपूर WCl क्षेत्र सास्ती, धोपटाला 2 कामगारांचा विषारी वायू गळतीमुळे मृत्यू

 



बल्लारपूर WCl क्षेत्र सास्ती, धोपटाला कामगारांचा  विषारी वायू गळतीमुळे मृत्यू  

 ◾अन्य 2 व्यक्तीची प्रकृती गंभीर 

बल्लारपूर/राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : राजुरा तालुक्यातील WCL बल्लारपूर एरियातील  वेकोलीच्या सास्ती,धोपटाळा टॉऊनशिप कोळसा खाणी खाणीतील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील गटार सफाई चे काम करायला गेलेल्या कामगारांचा विषारी वायू गळतीमुळे अपघात झाला असुन त्यातील दोन कामगारांचे निधन झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 10:15 च्या दरम्यान अंजना कोपुल्ला, सुभाष खंडारकर व राजू जनजरला हे कंत्राटी कामगार तसेच प्रमोद वभिटकार, सुशील कोरडे नामक वेकोली कर्मचारी व ग्रापंचायतीचा सफाई कर्मचारी शंकर अंडगुला हे वेकोलीच्या धोपटाळा वसाहतीच्या सांडपाण्याच्या नाल्याची सफाई करण्यासाठी गेले होते. दरम्यान 8 ते 10 फुट खोल टाक्यात उतरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. मात्र नाली खोल असल्याने व श्र्वास कोंडल्यामुळे त्यांना वर असलेल्या इतर कामगारांना आवाज देणेसुद्धा शक्य होत नव्हते. मात्र आत उतरलेल्या कर्मचाऱ्यांचा कुठलाही आवाज अथवा प्रतिसाद येत नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी टाक्यात डोकावुन पाहीले असता त्यांना तिथे काहीतरी अघटीत घडले असल्याचा संशय आला परिस्थिती जाणुन घेण्यासाठी अजुन एक कर्मचारी टाक्यात उतरला मात्र त्यालाही विषारी वायूमुळे त्रास होऊ लागला. हे लक्षात येताच उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये हल्लाकल्लोळ माजला व त्यांनी आरडाओरड सुरू करताच परिसरातील नागरिक धावून आले व त्यांनी वेकोली अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देताच तातडीने जेसीबी घटनास्थळी पाठविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने नाल्यावर असलेले काँक्रिट चे झाकण तोडल्यावर टाक्यातून प्रचंड दुर्गंधी व वायु बाहेर निघाला. आत डोकावून बघितले असता काही कामगार जवळपास बेशुद्ध तर एक कर्मचारी जोरात श्वास घेताना आढळून आल्याने टाक्यात फसलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शंकर अंडगुला ह्यांनी टाक्यात उडी घेतली व कर्मचाऱ्यांना दोर व शिडीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. सर्व कामगारांना तत्काळ वेकीलीच्या क्षेत्रिय इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर येथील वेकोलीच्या विभागीय इस्पितळात पाठविण्यात आले. उपचारादरम्यान सुभाष खंडारकर व राजू जनजरला  ह्या दोन कामगारांचा मृत्यु झाल्याची खात्रीदायक माहिती असुन इतर कर्मचारी अजुनही अत्यवस्थ आहे तर सुशील कोरडे ह्याची प्रकृती नाजुक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपुर येथे पाठविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments