प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचे शानदार उद्घाटन
पत्रकारांनी संघटित लढा देण्याची गरज-राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे
भंडारा ( राज्य रिपोर्टर ) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचे नुकतेच साकोली येथे शानदार उद्घाटन पार पडले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखडे उपस्थित होते.
याप्रसंगी संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे म्हणाले की, 'पत्रकारावर अन्याय होत असेल तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज आहे तसेच पत्रकारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकारांनी एकत्रित येऊन लढा उभारावा असेही आवाहन केले. राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रगतीपथावर असून पत्रकारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन अध्यक्षस्थानावरून त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी केले. तर आभार मनीषा काशीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महिला युवती अध्यक्ष रोहिणी रणदिवे, लाखांदूर तालुका अध्यक्ष प्रा. प्रेमानंद हटवार, साकोली तालुका सचिव मनीषा काशिवार, सहसचिव चेतक हत्तीमारे, कोषाध्यक्ष सौरभ गोस्वामी, साकोली तालुका प्रसिद्धीप्रमुख पत्रकार निकिता कुंभरे, पत्रकार रवींद्र घरत, देवेंद्र रहांगडाले, पत्रकार मदन लांडगे, पत्रकार ऋग्वेद येवले, पत्रकार शेखर इसापुरे, पत्रकार रवी भोंगाने, सचिव ताराचंद कापगते, प्रसिद्धी प्रमुख शेखर इसापुरे, कोषाध्यक्ष रवींद्र घरत, पत्रकार मनोज राजघाट, पत्रकार संजय गजघाट आदी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
0 Comments