बल्लारपूरात उत्तरप्रदेशासह, मणिपूर, गोवा व उत्तराखंड विजयाचा भारतीय जनता पार्टी कडून जल्लोषात साजरा !

 


बल्लारपूरात उत्तरप्रदेशासह, मणिपूर, गोवा व उत्तराखंड विजयाचा भारतीय जनता पार्टी कडून जल्लोषात साजरा !

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मनिपुर, गोवा येथे पार पडलेल्या विधानसभा चुनाव मध्ये  भारतीय जनता पार्टी ने ऐतिहासिक सुशासन व विकासात्मक विजय जनतेच्या आशीर्वादाने संपादन केल्याबद्दल आज दि.१०/३/२०२२ रोज गुरुवारला भारतीय जनता पार्टी बल्लारपूर च्या वतीने नगर परिषद चौक बल्लारपूर येथे भारत माता की जय, वंदे मातरम, फिर एक बार मोदी सरकार, हर हर मोदी घर घर मोदी,मोदी है तो मुमकिन है अश्या जयघोषात गाजवून भव्य जल्लोष चा कार्यक्रम घेण्यात आला.

 या कार्यक्रमास प्रामुख्याने भारत देशाचे माजी गृहराज्यमंत्री मा.श्री. हंसराज अहिर,वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा.श्री. चंदनसिंह चंदेल,बल्लारपूर नगर परिषद चे माजी अध्यक्ष मा.श्री. हरीश शर्मा, बल्लारपूर भाजपा शहराध्यक्ष श्री. काशिनाथ सिंह उपस्थित होते. 

या कार्यकर्त्यांच्या भव्य जल्लोष कार्यक्रमाला मान्यवरांनी संबोधित करताना देशात या विधानसभाच्या घोषीत निकालामुळे एक नवीन ऊर्जा, उत्साह प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात व रक्तात सळसळत असून येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आम्ही अंगावर घेऊन मेहनतीच्या बळावर संघटनाच्या बळावर यश संपादन करू असं मत व्यक्त केलं. 

हा विजय राष्ट्रवाद,विकास व जन कल्याणाला समर्पित असून  पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी राम राज्य निर्माण करण्याकरिता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा,योजनांचा विजय आहे. 

भारतीय जनता पार्टी प्रत्येक राज्यात नाही तर संपूर्ण देशात सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास या धोरणावर कार्य करत असते.यामुळे जमिनीशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्ती चा पक्षासोबत एक अटूट नात निर्माण होत असतं.भारतीय जनता पार्टी हा फक्त एक राजकीय पक्ष नसून जनसामान्याचा परिवार आहे व या परिवारात प्रत्येक व्यक्तीच सुख-दुःख हे भारतीय जनता पार्टीच  सुखदुःख आहे हेच मनात ठेऊन पक्षाचा कार्यकर्ता हा जमिनीवर समाजात कार्यरत असतो.नेहमी सकारात्मक बदल करण्याकरिता झुंजत असतो व या जगातील शेवटच्या माणसापर्यंत एकात्मता मानवतेचा विचार पोहचविण्याकरीता लढत असतो.

        याप्रसंगी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ढोल ताशे वाजवून फटाके फोडून व मिठाई वाटून मोठ्या आनंदात उत्साहात जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते  श्री. शिवचंद द्विवेदी, श्री. निलेश खरबडे, श्री. समीर केने, सौ.रेणुका दुधे, श्री. राजू दारी, श्री. श्रीनिवास सुंचुवार, श्री. शेख जुम्मन रिझवी,भाजपा शहर महामंत्री श्री. मनीष पांडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री. आशिष देवतळे,भाजयूमो शहर अध्यक्ष श्री. रनंजय सिंह,महिला आघाडी अध्यक्ष सौ. वैशाली जोशी, महिला आघाडी महामंत्री सौ. वर्षा सुंचुवार,सौ. आरती अक्केवार, नगरसेविका  सौ. सुवर्णा भटारकर, सौ. जयश्री मोहुरले सौ.सारिका कनकम, सौ. आशा संगीडवार, नगरसेवक श्री. येल्लय्या दासरफ ,नगरसेवक श्री. अरुण वाघमारे,नगरसेवक श्री. स्वामी रायबरम, भाजपा शहर उपाध्यक्ष श्री. राजेश दासरवार,भाजपा शहर सचिव इंजि. देवेंद्र वाटकर ,श्री. सतीश कनकम, भाजयूमो शहर महामंत्री श्री. घनश्याम बुरडकर,भाजपा युवा नेते  सर्व श्री. मेघनाथ सिंह,छगन जुलमे ,संजय मुप्पिडवार, श्रीनिवास चिरकुतोटावार, विरन्ना, बदावत,अरविंद दुबे, अरुण भटारकर,प्रमोद रामिल्ला,बबलू गुप्ता, नफीस अन्सारी, ओम प्रकाश प्रसाद, राजेश शहा, विशाल शर्मा, प्रभदीप सचदेवा,सरोज सिंह, विकास दुपारे,राजकुमार श्रीवास्तव, किशोर मोहुरले, मुन्ना बौराशी,मोहित डांगोरे, संजय वाचपेयी,मिथिलेश खेंगर, रामेश्वर पासवान,अरविंद वर्मा, राजेश कैथवास,सचिन उमरे, मनीष पोलशेट्टीवार, कार्तिक रामटेके, प्रणित देशमुख, श्रीकांत आंबेकर,राहुल कोत्तावार, नयन बोम्मावार, पारस लेनगुरे, प्रिझम वाढई, अश्विन वरखडे, सौ. संध्या मिश्रा,सौ.सुरेखा श्रीवास्तव, सौ.अर्चना हिरे, सईदा शेख,व अन्य महिला आणि पुरुष भाजपा कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments