चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड मार्फत चना खरेदी केंद्र सुरु करा - आ. किशोर जोरगेवार

 


चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड मार्फत चना खरेदी केंद्र सुरु करा - आ. किशोर जोरगेवार  

◾जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे ना मागणी

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्यापही नाफेडच्या माध्यमातून चना खरेदी केंद्र सुरु झालेली नाही त्यामूळे चना उत्पादन शेतक-र्यांना चना विक्रीकरिता अडचणी येत आहे. हि बाब लक्षात घेता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड च्या माध्यमातून चना खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय  गुल्हाणे  यांना निवेदनच्या माध्यमातून केली आहे.

  चंद्रपूर तालुका हा मोठ्या प्रमाणात चना उत्पादक असून आता चना हंगाम सुरु आहे. मात्र चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता  चंद्रपूर जिल्ह्यातील इतर ठिकाणी नाफेड च्या माध्यमातून चना खरेदी केंद्र सुरु झाले आहे. येथे चना खरेदीहि  केल्या जात आहे. मात्र केवळ चंद्रपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अद्यापही चना खरेदी केंद्र सुरु झालेले नाही आहे. त्यामुळे चना उत्पादक शेतकर्यांची अडते व व्यापार्यांकडून मोठ्या प्रमाणात लुट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

   त्यामूळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान व एन् हंगामात चना खरेदी केंद्र नसल्यामुळे साठवणुकीची समस्या लक्षात घेता त्वरित चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नाफेड च्या माध्यमातून चना खरेदी केंद्र सुरु करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना केली आहे.

Post a Comment

0 Comments