राजा माने यांच्या पुस्तकाचे लोकार्पण ३०मार्चला राजभवनावर!
◾नितीन खिलारेंच्या रेखाचित्रांचेही प्रदर्शन
मुंबई, ( राज्य रिपोर्टर ) : ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांच्या "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.."या पुस्तकाचे लोकार्पण तसेच चित्रकार नितीन खिलारे यांच्या रेखाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, लोकमत माध्यम समुहाचे चेअरमन माजी खासदार विजयबाबू दर्डा यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक ३० मार्च रोजी राजभवनावर विशेष सोहळ्यात सकाळी ११ वाजता होत आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील ७५ व्यक्तिमत्त्वातील विशेष पैलूंवर ज्येष्ठ संपादक राजा माने प्रकाश टाकला आहे. त्या मान्यवरांची व्यक्तीचित्रे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटली आहेत.पुस्तकाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रस्तावना तर पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे मलपृष्ठ मनोगत लाभले आहे.या उपक्रमाचे संयोजक कोरोना संकट काळात राज्यातील पहिली ऑक्सीजन सिलेंडर बँक सरु करणारे बार्शीचे मातृभूमी प्रतिष्ठान आहे.पुस्तकाचे प्रकाशक प्रगती प्रकाशन आहे. लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण खालील लिंक वरुन होणार आहे.प्रक्षेपण आवर्जून पाहण्याचे आवाहन मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रतापराव जगदाळे, प्रगती प्रकाशनचे संचालक दत्ता थोरे व संतोष पवार यांनी केले आहे.
0 Comments