चंद्रपुरातील कारागृहातील तुरुंग अधिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

  



चंद्रपुरातील कारागृहातील तुरुंग अधिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका तुरुंग अधिकाऱ्याने आपल्याच प्रेयसीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल रात्री १०:०० वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे वेळेवर चंद्रपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला महेश माळी, वय-३७ वर्ष असे तुरुंग अधिकाऱ्याचे नाव असून विश्वसनीय सूत्राच्या माहिती नुसार हे तुरुंग अधिकारी यापूर्वी गडचिरोलीत कार्यरत होते व याच दरम्यान त्याचे एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध जुडले विशेष म्हणजे माळी हे विवाहित असून त्यांना २ अपत्य आहे तसेच त्यांची प्रेयसी ही भंडारा जिल्ह्यात कार्यरत होती मात्र तिची बदली चंद्रपुरात झाली याच दरम्यान काल रात्री ९:३० ते १०:०० वा तुरुंग अधिकारी हे आपल्या प्रेयसीच्या घरी गेले त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला असल्याचा अंदाज आहे. व यातूनच तुरुंग अधिकारी माळी यांनी गळफास घेतला मात्र त्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला सद्यस्थितीत त्यांचे वर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Post a Comment

0 Comments