राष्ट्रवंदनेने यंग चांदा ब्रिगेडच्या चार दिवसीय भजन महोत्सवाचा समारोप

 


राष्ट्रवंदनेने यंग चांदा ब्रिगेडच्या चार दिवसीय भजन महोत्सवाचा समारोप

◾विविध भाषीय १०० भजन मंडळांच्या भजनांनी गाजला भजन महोत्सव, अमरावतीच्या उपमहापौरांची भजन महोत्सवाला भेट


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : महाशिवरात्री निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विविध भाषीय १०० भजन मंडळांच्या भजन महोत्सवाची काल शुक्रवारी राष्ट्रवंदनेने सांगता करण्यात आली. चार दिवस चाललेल्या या भजन महोत्सवात मराठी, हिंदी, तेलूगु, बंगाली, पंजाबी,गुजराती आणि भोजपूरी भाषेत भजन मंडळांनी भजनाचे गायन केले. भजन महोत्सवाच्या तिस-या दिवशी अमरावतीच्या उपमहापौर कुसुमभारत साहू यांनी भजन महोत्सवला भेट दिली.


   समोरापीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निवृत्त प्राध्यापक श्याम धोपटे यांची तर प्रमूख अतिथी म्हणून कल्यानी किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, शहर संघटक पंकज गुप्ता, कापटे गुरुजी, दादाजी नंदनवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाधीकारी मुन्ना जोगी, शंकरराव कुंडले आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

     महाशिवरात्री निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अंचलेश्वर मंदिर येथे विविध भाषीय १०० भजन मंडळांच्या भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या भजन महोत्सवात १०० भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. चार दिवस चाललेल्या या भजन महोत्सवामूळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. महोत्सवाच्या दिस-या दिवशी अमरावतीच्या उपमहापौर कुसुमभारत साहू यांनी भजन महोत्सवाला भेट देत भजन गायले. यावेळी त्यांच्यासोबत मिराबाई साहु, अनिता केरावानी, विमला साहू, दिप्ती चनर आदिंची उपस्थिती होती. तर काल शुक्रवारी सदर महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ३८ भजन मंडळांनी सहभाग घेत भजनातून वातावरण भक्तीमय केले. महोत्सवाचे १०० वे भजन मंजुळा बाल भजन मंडळाने सादर केले. यावेळी बालकांनी 'देव बाजारचा भाजीपाला नाही रे' हे भजन गात सार्यांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमात भजन महोत्सवात सहभागी झालेल्या भजन मंडळांचा सत्कार करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे संचालन करिश्मा दिवटे तर आभार प्रदर्शन भुमेश्वरी धर्मपूरीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडचे चंद्रशेखर देशमूख, प्रतिक हजारे, आशा देशमुख, हेमलता पोईनकर, कल्पना शिंदे, वंदना हजारे, विमल काटकर, दूर्गा वैरागडे, नंदा पंधरे, दर्शना चाफले, शमा काजी, सवीता झाडे, रुपा परसराम, वैशाली मेश्राम, सविता दंडारे, गोपी मित्रा, सतनाम सिंह मिरधा आदिंनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments