जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन, महाराष्ट्र,राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ वितरण सोहळा.

 


जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन, महाराष्ट्र,राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ वितरण सोहळा.

◾पुणे येथे केंद्रीय पंचायत राज मंत्री नाम. कपील पाटील यांच्या हस्ते स्विकारला पुरस्कार 

◾राज्यातील सर्वोत्कृष्ट १० जि.प. सदस्यांमध्ये संजय गजपुरे सन्मानित 

◾राज्यातील सर्वोत्कृष्ट ५ जि.प. विषय सभापती मध्ये ब्रिजभूषण पाझारे सन्मानित 

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) :   जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन , महाराष्ट्र , राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ वितरण सोहळा. दिनांक ७ मार्च २०२२ , सोमवार ला केंद्रीय पंचायत राज मंत्री माननीय श्री. कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते पुणे येथील अण्णासाहेब साठे सभागृहात संपन्न झाला .

            या कार्यक्रमात राज्य स्तरीय पुरस्कार साठी  महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट १० जिल्हा परिषद सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टी , चंद्रपुरचे जिल्हा संघटन महामंत्री व जि.प . सदस्य संजय गजपुरे यांना सन्मानित करण्यात आले .  तर राज्यातील सर्वोत्कृष्ट ५ जि.प. विषय सभापतीमध्ये भाजपा महानगर जिल्हा महामंत्री व जि.प. चे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांना सन्मानित करण्यात आले. 

          याप्रसंगी असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांची उपस्थिती होती . याप्रसंगी संजय गजपुरे व ब्रिजभूषण पाझारे यांनीही व्यासपीठावरुन मनोगत व्यक्त केले . 

 

Post a Comment

0 Comments