काँग्रेस नगरसेवक नंदू नागरकर वरील हल्ल्याप्रकरणी ३ युवकांना अटक : हटकल्याच्या रागातून हल्ला केल्याचा अंदाज

  


काँग्रेस नगरसेवक नंदू नागरकर वरील हल्ल्याप्रकरणी ३ युवकांना अटक : हटकल्याच्या रागातून हल्ला केल्याचा अंदाज

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :चंद्रपूरच्या काँग्रेस नगरसेवक हल्ला प्रकरणातील आरोपी अखेर गवसले आहेत. ४ मार्च रोजी सकाळी मॉर्निंग वॉकवरून परतणाऱ्या नगरसेवक नंदू नागरकर  यांच्यावर ३ युवकांनी क्रिकेट बॅटने हल्ला केला होता. राजकीय नेत्यावरील या हल्ल्यानंतर राजकीय, प्रशासकीय वर्तुळ हादरले होते. पालकमंत्री, खासदार व भाजप नेते मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालकांपर्यंत हल्ल्याची तक्रार केली होती. चंद्रपूर पोलिसांनी ४ तपास पथके तयार करून बुरखाधारी ३ युवक आणि दुचाकीचा शोध घेत होते. पोलिसांवर असलेल्या प्रचंड दबावानंतर आता तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भातील विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार शानु उर्फ आसिफ अली आशिक अली ( २६ ), राजेश केवट ( २० ), सुमित बहुरिया ( २२ ) महाकाली कॉलरी निवासी   अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे तिघेही रय्यतवारी कॉलरी येथील निवासी आहेत नंदू नागरकर यांनी हटकल्याच्या रागातून त्यांच्यावर हल्ला

प्राथमिक माहितीनुसार शहरातील एका मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल नागरकर यांना लागल्याने त्यांनी या मुलांना हटकले होते. त्याचा राग मनात ठेवून नगरसेवक नागरकर यांना तिघांनी लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. नागरकर यांच्यावर पाळत ठेवून हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागितली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

Post a Comment

0 Comments