आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे

 


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे

◾वरोरा-भद्रावती येथील पक्षीय बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना - हंसराज अहीर यांचे आवाहन

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : भाजपा समाजकारणातून राजकारण करणारा लोकाभिमुख पक्ष आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कणखर नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे.

 सबका साथ सबका विकास या तत्वाने त्यांनी लोकांच्या व देशाच्या विकासात फार मोठे योगदान दिल्याने प्रथम क्रमांकाच्या या पक्षाचे स्थान अढळ ठेवण्याकरीता पक्ष संघटन मजबूतीने उभे करण्याची जबाबदारी पदाधिकारी तसेच पक्षाचा कणा असलेल्या कार्यकत्र्यांवर असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व अन्य निवडणूकांमध्ये पक्षाला विजयाच्या मार्गावर नेण्याकरीता बुथ रचना, लोकसंपर्क व केंद्राच्या योजना घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घ्यावे असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले.

वरोरा विधानसभा क्षेत्रात दि 19 मार्च रोजी वरोरा व भद्रावती येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकिस संबोधित करतांना ते बोलत होते. या बैठकीस चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक खुशाल बोंडे, वरोरा चे पूर्व नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजपा नेते ओम मांडवकर, सुरेश महाजन, सायरा शेख, सुनीता  काकडे भद्रावती येथील विजय वानखेडे, प्रविण सातपूते, सुनिल नामोजवार, विनोद गोवारदिपे, संजय वासेकर, अमित गुंडावार, प्रशांत डाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये हंसराज अहीर यांनी उत्तर प्रदेश व अन्य तीन राज्यातील भाजपाचा विजय हा उत्तम नियोजन व जनसंपर्क तसेच विकास कार्याच्या बळावर झालेला आहे. यातून बोध घेत कार्यकर्त्यांनी  बुथ रचनेपासून तर शक्तीकेंद्रापर्यंत विविध कार्यक्रम आयोजीत करुन राज्यसरकारच्या नाकर्तेपणाविरुध्द आंदोलनात्मक भूमिका घेवून संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. जि.प., पं.स. क्षेत्रात दौरे करुन लोकसंपर्कातून पक्ष बांधणी करण्याच्या सुचना उपस्थित पदाधिकारी व कार्यकत्यांना  केल्या. यावेळी अन्य उपस्थित मान्यवरांनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले.

या बैठकीस विधानसभा क्षेत्रातील सर्वश्री इम्रान खान, माधव बांगडे, सुनिल खारकर, गोपाल गोसवाडे, गजानन कामतवार, डाॅ. गुणानंद दुर्गे, अनिल साकरीया, मनीषा मेश्राम, सुनील समर्थ, राजेश साकुरे, विनोद लोहकरे, महेश श्रीरंग, संजय राम, दीपक डोंगरवार, सुरज चैधरी, कांबळे गुरुजी, केशव लांजेकर, विशाल ठंेंगणे, सत्तार शेख, तौसिफ शेख, तेजस कुंभारे, दिपक पारधे, अनंता मांढरे, निशांत देवगडे, शिवा पांढरे, पवन हुरकट, सुर्यकांत गौरकार, बबलू सयद यांचे सह वरोरा भद्रावती येथील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments