धक्कादायक ! नागपुरात शालेय बस कंडक्टरची निघृण हत्या : मृतदेह प्लास्टिक बॅग मध्ये भरून फेकल्याचा संशय

 



धक्कादायक ! नागपुरात शालेय बस कंडक्टरची निघृण हत्या : मृतदेह प्लास्टिक बॅग मध्ये भरून फेकल्याचा संशय 

नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : नागपूर शहर एक शिस्तबद्ध शहर म्हणून ओळखले जाते जिथे नाग लोकांच्या प्रेरणेतून महामानवानी दिलेली बौध्द धम्माची दीक्षा तसेच दसऱ्याच्या निमित्ताने होणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलनाद्वारे घडण्यात येणारी शिस्तबद्धता यामुळे नागपूर शहर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिध्द आहे एकेकाळचे शांत व संयमित असणारे शहर आज गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे नागपुरातील हत्यांचं सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. एका शालेय बसवर असलेल्या महिला कंडक्टरची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत उप्पलवाडी रोडवर काल (२७ मार्च) संध्याकाळी ७:०० वाजताच्या सुमारास एका प्लास्टिक बॅगमध्ये महिलेचा मृतदेह गुंडाळून फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह ४१ वर्षीय दीपा दास या महिलेचा असून त्या नागपुरातील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली.दीपा दास यांनी शनिवारी (२६ मार्च) त्यांच्या नित्यक्रमाने बसमधील सर्व मुलांना घरी सोडले. त्यानंतर कुशीनगर भागात त्या देखील बसमधून उतरल्या. तिथून त्या आपल्या एका मैत्रिणीच्या घरी गेल्या. मैत्रिणीकडे दहा मिनिटं थांबल्यानंतर घरी परत जात असताना त्या बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीय आणि पोलीस शनिवार संध्याकाळपासून त्यांचा शोध घेत होते. मात्र रविवारी संध्याकाळी उप्पलवाडी रोडवर प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळलेला अवस्थेत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर केलेल्या तपासात तो मृतदेह शालेय बसवर कंडक्टर असलेल्या दीपा दास यांचा असल्याचं समोर आलं. दीपा दास यांची हत्या कोणी आणि का केली हे अजूनही स्पष्ट नाही. दरम्यान दीपा दास यांची हत्या इतर ठिकाणी केल्यानंतर मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरुन गोपळवाडी रोडवर फेकला असावा, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments