पत्नीचे अनैतिक संबंधातून झालेली पतीचा हत्या



पत्नीचे अनैतिक संबंधातून झालेली पतीचा हत्या 

◾बल्लारपूर पोलीस 48 तासातच हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासाअंती उघड केले 

◾तीन आरोपी अटक 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : 10 मार्च रोजी रात्री 9 : 00 वाजता राजुरा येथुन बल्लारपूर कडे येताना एक व्यक्ती दुचाकीसह नदीत पडल्याचे व एक व्यक्ती पुलावर पडल्याची घटना घडली होती. या घटनेला अपघाताचा स्वरूप दाखविण्याचा प्रयत्न केला गेला पण बल्लारपूर पोलिसांनी अवघ्या  48 तासातच हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासाअंती उघड केले असुन अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक रामेश्वर उर्फ ( लाला ) कालीचरण निषाद ( 40 ) आणि आरोपी सुरज हुबलस सोनकर ( 24 ) रा.डाॅ.आंबेडकर वार्ड बल्लारपुर शेजारी राहत होते मृतक रामेश्वरच्या पत्नी सुमन रामेश्वरच्या निषाद ( 38 )  सोबत आरोपी सुरज सोनकर चे अनैतिक प्रेम संबंध जुळले असल्याची माहिती आहे.

रामुचा दाबा  राजुरा येथे जेवण करण्याचे बाहण्याने त्यांचे बल्लारपुर येथील घरातुन बोलवुन सातनल चौंक व राजुरा येथे त्यास दारू पाजुन त्यास वर्धा  नदीच्या पात्रात  घेवुन जावुन पाण्यात डोके बुडवुन त्याचा खुन केले.काटाप्रमाणे सदरचे प्रेत नदीपात्रात टाकून दिले.  दोघांच्या प्रेमात पती अडसर ठरला होता त्याचा काटा काढायचा कट मागील दोन महिन्यापासून शिजला होता अगोदर ही कट रचला होता पण यशस्वी झाले नाही दिनांक १० मार्च रोजी आरोपी सुरज आणि सोबत असलेला दुसरा आरोपी अभिजित दिनेश पांडे ( 21 ) रा, सुभाष वार्ड बल्लारपूर, ( करणवाडी-मारेगाव, जिल्हा यवतमाळ ) याला सोबत घेऊन तिघेही राजुरा इथे राजु  धाब्यावर जेवणाची पार्टी करिता मृतक रामेश्वर ला घेऊन गेले. तिथे जाण्यापूर्वी तिघांनीही मद्यप्राशन केले. धाब्यावर जेवण करून परत येताना वर्धा नदीच्या पुलाजवळ आरोपींनी  रात्री रस्त्यावर रहदारी नसल्याचे  पुलावरून नदीत  बजाज डिस्कवर मोटरसाइकिल  नदीत फेकली. 

रामेश्वर कालीचरण निषाद यांच्या हत्येचा कट रचुन आरोपी क्र.1) सुरज हुबलाल सोनकर 2) अभिजीत दिनेश पांडे 3) मृतकाची पत्नी- सुमन रामेश्वर निषाद असे मिळून आरोपी सुमनचा पती रामेश्वर कालीचरण निषाद यांचा हत्येचा कट रचले. अपराध क्रमांक. 283/22 कलम 302,120(ब), 201भादवी.  PCR 16/3/2022 पर्यंत.

 घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना  कळताच पोलिसांनी रामेश्वरचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान नदीपात्रात दुचाकी आढळून आली मात्र रामेश्वरचा मृतदेह सापडला नव्हता. मात्र ह्या घडामोडीत पोलिसांना दुसराच संशय येत असल्याने व मिळणाऱ्या माहितीमध्ये घोळ असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास केला असता हा अपघात नसुन अनैतिक संबंधातून केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे मार्गदर्शनाखाली  तपास शैलेंद्र ठाकरे सपोनि बल्लारपुर  पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments