वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा जवळ विचित्र अपघात २ ठार ३ जखमी

 


वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा जवळ विचित्र अपघात २ ठार ३ जखमी 

◾जखमीत सावंगी मेघेत उपचार सुरू

वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : मागील काही दिवसांपूर्वी सावंगी मेघेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा सेलसुरा जवळ अपघात झाल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा त्याच ठिकाणी विचित्र अपघात घडल्याचे वृत्त आहे या अपघातात २ ठार तर ३ जखमी झाले आहे सदर अपघात आज रविवारला पहाटेच्या सुमारास घडला असल्याचे वृत्त आहे या अपघातात रेयांश राकेश चाफले वय-४ वर्ष, नरेंद्र भुराजी जुमनाके वय-२८ वर्ष, या दोघांचा मृत्यू झाला आहे तर चंद्रशेखर वाट - ३०,  ललिता राकेश चाफले - ३६ गोल्डी सिंग - ३७ वर्ष हे गंभीर जखमी झाले आहे तर जोग सिंग -३२ वर्ष हे किरकोळ जखमी झाले आहेत यांच्यावर सावंगी च्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भातील अधिक माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा जवळ जात असताना चारचाकी इंडिका वाहनांच्या समोर अचानक रानडुक्कर आल्याने वाहणावरचे नियंत्रण सुटले व अपघात घडला या अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी दुचाकीने जानाऱ्या एक व्यक्ती मदतीसाठी गेला असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिलेला व लहान मुलाला भरधाव वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर वाहनाने अपघात ग्रस्त इंडिका सह या दोन व्यक्तींना जबर धडक दिली तसेच एका दुचाकीलाही धडक दिली या अपघातात रेयांश राकेश चाफले वय-४ वर्ष, व नरेंद्र भुराजी जुमनाके -२८ वर्ष यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ४ जखमींवर सावंगी च्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेचे वृत्त कळताच पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी, धनाजी जळक, पोलीस निरीक्षक सांवगी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला या घटनेचा पुढील तपास सावंगी पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments