बल्लारशाह-मुंबई एक्सप्रेस ला हिरवी झेंडी मिळाल्याची माहिती

 


बल्लारशाह-मुंबई एक्सप्रेस ला हिरवी झेंडी मिळाल्याची माहिती 

◾ येत्या १५ एप्रिल पासून सुरू होण्याची शक्यता ?

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मार्च २०१९ पासून भारतासह जगभरात कोरोना या विषाणूजन्य आजाराने धुमाकूळ घालणे सुरू केले या पार्श्वभूमीवर बल्लारपूर वासीयांना मुंबईला जाणारी सोयीची असलेली बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही बंद झाली होती मात्र सद्यस्थितीत कोरोना संकट टळल्या नंतर आज होईल उद्या होईल मात्र सेवाग्राम एक्सप्रेस ही कायमस्वरूपी बंद झाली त्यामुळं चंद्रपूर, बल्लारपूर परिसरातील नागरिकांचे मुंबईला जाणे अडचणीचे झाले होते या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी सातत्याने मागणी रेटून धरल्यामुळे मध्य रेल्वेने बल्लारशाह-मुंबई ही थेट रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिल्याची माहिती असून बल्लारशाह-मुंबई एक्सप्रेस येत्या १५ एप्रिल पासून सुरू होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे. यापूर्वी बल्लारपूर, चंद्रपूर परिसरातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी पूर्वी सेवाग्राम एक्सप्रेस होती बल्लारशाह वरून सहा डब्बे वर्धा-बल्लारशाह पेसेंजरला जोडले जायचे व नागपूर वरून येणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेस ला मुंबईला जाण्यासाठी सदर डब्बे जोडले जायचे मात्र कोरोनानंतर हक्काची असणारी सेवाग्राम लिंक एक्सप्रेस कायमची बंद केली आहे. विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, माजी वित्त, वन व नियोजन मंत्री आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार, झेडआरयुसीसी मध्य रेल्वेच्या सदस्य श्रीनिवास सुंचूवार, अजय दुबे  यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी नी रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार करून सदर मुद्दा रेटून धरला होता त्यातच बल्लारशाह येथील पिट लाईन चे काम पूर्णत्वास येत आहे विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार येत्या १५ एप्रिल पासून बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून रात्री ९:३० वाजता दररोज ही ट्रेन मुंबई येथे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments