अबब ! मुलगा नाही म्हणून काय झालं ! वधुपित्यांनी काढली आपल्या लाडक्या मुलींची घोड्यावरून वरात

 



अबब ! मुलगा नाही म्हणून काय झालं ! वधुपित्यांनी काढली आपल्या लाडक्या मुलींची घोड्यावरून वरात 

वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते जिथे पुरातन काळात स्त्री ही "चूल आणि मूल" पर्यंत मर्यादित होती तिथे सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मा जिजाऊ, मातोश्री रमाबाई नी स्त्री शिक्षण व समाज सुधारणे साठी मौलाचे कार्य केले त्यातूनच वर्तमान स्थितीत स्त्री अनेक उच्च पदावर गेली आहे मात्र विवाह संस्थेचा विचार करता आपल्या देशात शक्यतो मुलाच्या लग्नात मोठी हौस मौज करतात, पण हीच परंपरा मोडीत काढत एका दाम्पत्याला मुलगा नाही, म्हणून मुलीच्या लग्नात आपल्या लाडक्या लेकीची घोड्यावरून वरात काढून आपली लग्नातील हौस मौज केली आहे. लग्नाच्या रेशिमगाठीचे क्षण स्मरणीय करण्या- करता लग्नात कोणतीच कसर ठेवल्या जात नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सदर घटना आहे, कधी वरात हेलिकॉप्टर  कधी बैलगाडी कधी मोटरसायकल यावर आपण पाहिली असेल ती पण नवरदेवाची. पण नवरी मुलीची वरात येथे घोड्यावर काढली आहे. दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वकाही ठप्प झाले होते. त्यातच लग्नकार्य जे धूमधडाक्याने साजरे होतात त्यावर देखील निर्बंध आले होते. पण आता काही प्रमाणात नियम शिथिल झाल्यामुळे पुन्हा एकदा बँडबाजे वरात मंडळी डिजेवर नाच गाणे पुन्हा एकदा दिसू लागले आहे. यातच बुलढाण्यातील खामगाव येथील विजयराव सांगळे व पुष्पा सांगळे यांची मुलगी समीक्षा हिचा विवाह प्रित्यर्थ तिचे तीची वरात चक्क घोड्यावर काढून एक आदर्श ठेवला असे म्हणावे लागेल. कारण विजयराव यांना दोन्ही मुली असताना आपल्याला मुलगा नाही याचं शल्य न ठेवता त्यांनी आपल्या मुलीची वरात घोड्यावरून काढली आहे. आज मुला- मुलींमध्ये भेद नाही. मुलगा मुलगी एक समान असे अनेक जनप्रबोधन केले जातात पण कृतीतून आदर्श सांगळे परिवाराने ठेवला आहे. तो निश्चित कौतुकास्पद आहे, असे म्हटल्यास वावग ठरणार नाही.



Post a Comment

0 Comments