बल्लारपूर नगर परिषदेची प्रभाग रचना जाहीर

 


बल्लारपूर नगर परिषदेची प्रभाग रचना जाहीर 

 ◾१७ मार्च पर्यंत सूचना व आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

◾बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रात १७ प्रभाग म्हणजे ३४ नगरसेवक

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील ७ नगर परिषदा व नगरपंचायत च्या पंचवार्षिक निवडणुका येत्या २ महिन्यात अपेक्षित असून राज्यातील ब वर्ग व क वर्ग नगर परिषदांच्या निवडणूक संबंधी मा.जिल्हाधिकारी यांना निवडणूक प्रक्रिया राबवून व त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करायचा आहे या यानुषणगाने बल्लारपूर नगर परिषदेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून यानुसार बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रात १७ प्रभाग घोषित ( प्रस्तावित )  करण्यात आले आहे.

बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रात १७ प्रभाग घोषित(प्रस्तावित) करण्यात आले आहे व यासंबंधीचे प्रसिद्धीपत्रक नगर परिषद बल्लारपूर, तहसील कार्यालय बल्लारपूर व उपविभागीय अधिकारी बल्लारपूर येथील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आले आहे तसेच https://ballarpurmahaulb.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे.

 विशेष म्हणजे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रात ३ सदस्यीय प्रभाग तर नगर पालिका क्षेत्रात २ सदस्यीय प्रभाग पध्दती असण्याला मान्यता देण्यात आली असून या यानुषणगाने बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रात १७ प्रभाग म्हणजे ३४ नगरसेवक असतील तसेच बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रात ८९४५२ ( संभाव्य ) एकूण मतदार आहेत तर अनुसूचित जाती - २६०२६ (संभाव्य) मतदार तर अनुसूचित जमाती - ६४९७ ( संभाव्य ) मतदार असल्याची नोंद आहे. यानुषणगाने नगर परिषद बल्लारपूर च्या संभावित प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती साठी (१०) तर अनुसूचित जमाती साठी (२) जागा राखीव तर (२२) जागा अराखीव ठेवण्यात आला अशा एकूण ३४ जागा असतील या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेवर सूचना व आक्षेप येत्या १७ मार्च पर्यंत नोंदविण्यात यावे असे आवाहन मा.विजय कुमार सरनाईक, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर व मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments