अहमदनगर पोलिसांनी अनुभवला " जय भीम " हा चित्रपट दाखविला

 


अहमदनगर पोलिसांनी अनुभवला " जय भीम " हा चित्रपट दाखविला

अहमदनगर ( राज्य रिपोर्टर ) : पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयसह अहमदनगर शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार, नगर तालुका, एमआयडीसी, वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना गुरूवारी 'जय भीम' हा चित्रपट दाखविला. अहमदनगर शहरातील एका चित्रपटगृहात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी ९ ते १२ यावेळेत हा चित्रपट पाहिला. यावेळी अधीक्षक पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या चित्रपटामध्ये अतिशय प्रभावीपणे, तामिळनाडूमध्ये १९९५ मध्ये झालेल्या एका उच्च न्यायालयातील खटल्याची गोष्ट मांडण्यात आली आहे. स्वतःच्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी सेंगणी, तिची बाजू कोर्टासमोर प्रभावी पणे मांडून तिला न्याय मिळवून देणारे वकील चद्रू आणि सर्व दबाव झुगारून निपक्षपातीपणे तपास करून सत्य न्यायालयासमोर ठेवणारे पोलीस अधिकारी पेरीमल स्वामी या कथेतील प्रमुख नायक आहेत.

जय भीम हा चित्रपट पोलीस दलाशी संबंधीत आहे. काम करताना येणार्‍या अडचणी, वरिष्ठांचे आदेश, नागरिकांशी येणारा संबंधी अशा परिस्थितीत पोलिसांची भूमीका महत्वाची असते.

पोलीस ठाण्यात दररोज दाखल होणारे गुन्हे, गुन्ह्याचा तपास, बंदोबस्त अशा एक ना अनेक कामांचा ताण पोलिसांवर असतो. यातून मुक्ती मिळण्यासाठी नगर पोलिसांनी जय भीम चित्रपट पाहिला.

Post a Comment

0 Comments