जिल्ह्यातील जिल्ह्यातील ८ नगरपरिषद/नगर पंचायतीच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित

  


जिल्ह्यातील जिल्ह्यातील ८ नगरपरिषद/नगर पंचायतीच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित

◾राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुढील प्रक्रिया सुरू होईल

 ◾बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चिमूर, मूल, घुग्घुस, नागभीड नगर परिषद तर भिसी 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या यानुषणगाने नगर परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मा.जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चिमूर, मूल, घुग्घुस, नागभीड नगर परिषद तर भिसी नगरपंचायत नगर परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम व प्रारूप प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे दि.१० मार्च ला घोषित केले होते व त्यावर १७ मार्च पर्यंत आक्षेप व हरकती मागविल्या होत्या परंतु २०२२ च्या महाराष्ट्र अधिनियम २१ दि १४/०३/२०२२ व राज्य निवडणूक आयोगाच्या पत्र क्र नप-२०२२/प्र.क्र.२/का.६/दि.१४/०३/२०२२ नुसार प्रभाग रचनेची सुरू केलेली वा पूर्ण केलेली प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे तसेच राज्य सरकारने पारित केलेल्या अधिनियमानुसार वरील प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात येईल तसेच वरील प्रक्रिया ही "राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेनुसार राज्य सरकारने करावयाची आहे" तरी सद्यस्थितीत प्रभाग रचनेच्या संदर्भात सुरू करण्यात आलेली सर्व प्रक्रिया ही स्थगित करण्यात येत असून राज्य सरकारचे नवीन निर्देश प्राप्त झाल्यावर नवीन प्रक्रिया ही राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेनुसार राज्य सरकार करील अशा प्रकारच्या सूचना मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बल्लारपूर सह जिल्ह्यातील ८ नगरपरिषदा/नगरपंचायतींना दि.१५ मार्च २०२२ च्या परिपत्रकानुसार दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments