अज्ञात वाहनांची दुचाकीला धडक : १ मृत्यू तर १ गंभीर जखमी

  


अज्ञात वाहनांची दुचाकीला धडक : १ मृत्यू तर १ गंभीर जखमी 

◾पळसगाव-येनबोडी रस्त्यावर घटना घडली

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : विसापूर येथे राहणारे दोन युवक आपल्या काही आवश्यक कामाकरिता आपल्या दुचाकी क्रमांक. MH 34 U 8401 या दुचाकीने कोठारीला गेले असता व आपलं काम आटोपून परत येत असताना पळसगाव-येनबोडी वळण रस्त्यावर जवळपास रात्री १०:०० वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना घडली या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १ गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार प्रवीण मुरलीधर अलाम व प्रवीण मशाखेत्री दोघेही रा.विसापूर हे आपल्या कामानिमित्त कोठारी वरून परत येत असताना रात्री १०:०० वाजताच्या सुमारास अपघात घडला असून या घटनेत प्रवीण मुरलीधर आलांम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे तर प्रवीण मशाखेत्री हे गंभीर जखमी असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास  पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments