पोलीस निरीक्षकाने ६० वर्षीय महिलेच्या कानशिलात वाजविल्याचा आरोप

  

पोलीस निरीक्षकाने ६० वर्षीय महिलेच्या कानशिलात वाजविल्याचा आरोप 

 ◾पोलीस निरीक्षक अशी कोणतीच घटना घडली नसून दोन्ही पक्षांना समज देऊन पाठविण्यात आल्याची स्पष्टोक्ती !

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महिला दिनी अनेक नामवंत व ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान करण्यात येतो, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात महिला दिनानंतर अजब प्रकार घडला, १० मार्च ला गोंडपीपरी शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये राहणाऱ्या जिजाबाई तुमडे यांचा नयन तुमडे, अनुसया तुमडे यांचेशी वाद झाला. तुमडे यांच्या घराजवळील शेण खड्ड्यात काही कोंबड्या मरण पावला यावरून नयन तुमडे व अनुसया तुमडे यांनी जिजाबाई यांना तुम्ही विषप्रयोग करीत आमच्या कोंबड्याना मारलं असा आरोप लावला. सदर प्रकरण गोंडपीपरी पोलीस स्टेशनमध्ये पोहचले असता, पोलिसांनी दोघांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले. जिजाबाई यांनी नयन व अनुसया तुमडे यांचेवर कारवाई करण्याची ठाणेदार राजगुरू यांचेकडे मागणी केली मात्र ठाणेदार राजगुरू यांनी काही न ऐकता ६० वर्षीय जिजाबाईला तू जास्त माजली, तुझी चरबी उतरवितो असे म्हणत जिजाबाईच्या कानशिलात लावली, त्यानंतर ठाणेदार राजगुरू यांनी शिपायाला बोलावीत या बाईला पट्ट्याने मार असा आदेश दिला. त्या शिपायाने जिजाबाईच्या पायावर व मांडीवर पट्ट्याचा मार दिला. असा थेट आरोप जिजाबाई तुमडे यांनी ठाणेदार राजगुरू यांचेवर पत्रकार परिषदेत केला. महिला दिनानंतर महिलेवर स्वतः ठाणेदाराने वृद्ध महिलेला केलेल हे मारहाण प्रकरण ठाणेदाराला न शोभणारे आहे.

पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस शिपाई असताना त्यांनी महिलेवर हात उगारण कितपत योग्य आहे? असा प्रश्न पत्रकार परिषदेत त्या महिलेने केला. 

जिजाबाईच्या आरोपावर ठाणेदार राजगुरू यांनी स्पष्टीकरण देत मारहाणीचे आरोप फेटाळून लावले, तुमडे यांचा जो वाद झाला होता त्यावेळी मी दोघांना समज देत परत पाठविले त्यादिवशी अशी कोणती घटना घडली नाही, जिजाबाई यांचा आरोप चुकीचा आहे.

Post a Comment

0 Comments