उत्तरप्रदेश , मणिपूर, गोवा व उत्तराखंड मध्ये भाजप तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येण्याची शक्यता

 



उत्तरप्रदेश , मणिपूर, गोवा व उत्तराखंड मध्ये भाजप तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येण्याची शक्यता

 ◾पाच राज्यातील निवडणूक निकाल

वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर ) : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यातील निवडणूक निकाल आज १० मार्च ला घोषित असतांना उत्तरप्रदेश सह गोवा, मणिपूर व उत्तराखंड मध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करेल असे चित्र दिसत आहे उत्तरप्रदेश चा विचार करता येथील जनतेने प्रादेशिक पक्षाला नाकारले की काय असे चित्र दिसून येत आहे  धक्कादायक बाब म्हणजे उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेस व बहुजन समाज पार्टीची स्थिती अत्यंत दयनीय आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे जरी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होत असला तरी योगी आदित्यनाथ आपली सत्ता राखतील असे चित्र दिसून येत आहे.

         यासोबतच गोवा, उत्तराखंड, व मणिपूर मध्ये ही सद्यस्थितीतील चित्रानुसार सत्ता स्थापन करेल अशी स्थिती आहे राष्ट्रीय पातळीवर एक नवा राष्ट्रीय पक्ष म्हणून आम आदमी पार्टी उदयास येत आहे आज पंजाब राज्यामध्ये दुपारी १;०० वाजेपर्यंत आलेल्या कला नुसार ११७ पैकी ९० जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे १० वर्षांपूर्वी एका आंदोलनातून निर्माण झालेला आम आदमी पार्टी सद्यस्थितीत दिल्लीसह पंजाब राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्याचा स्थितीत आहे. एकेकाळी राष्ट्रीय पातळीवर काम करणारा काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला की काय असे चित्र दिसत आहे. एकूणच पाच राज्यातील निवडणूक निकालाच चित्र पाहता उत्तरप्रदेश सह गोवा, मणिपूर व उत्तराखंड मध्ये भारतीय जनता पार्टी तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टी सत्ता स्थापन करेल असे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments