अंतरराष्ट्रीय महिला दीना निमित्त श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर द्वारे प्रयोगशील चित्रकार यांचा सत्कार



अंतरराष्ट्रीय महिला दीना निमित्त श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर द्वारे प्रयोगशील चित्रकार यांचा सत्कार

◾अंकिता नवघरे यांनी खिळे जोडणी, पेंटिंग व इतर चित्रकलेत नावीन्य प्रयोग केले


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : माननीय श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार, माजी अर्थ मंत्री तथा वनमंत्री महाराष्ट्र राज्य, लोकलेखा स्थायी समिती अध्यक्ष यांची प्रेरणा घेऊन स्थापन केलेली श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांच्या द्वारे आज दिनांक 08 मार्च अंतरराष्ट्रीय महिला दीना निमित्त बल्लारपूर येथील प्रयोगशील चित्रकार अंकिता नवघरे यांचा सत्कार करण्यात आला.

      या सत्कार समारंभात श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, समाजसेवक प्रकाश दोतपेल्ली, सुधाकर सिक्का, रिंकू गुप्ता आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. अंकिता नवघरे यांनी खिळे जोडणी, पेंटिंग व इतर चित्रकलेत नावीन्य प्रयोग केले असून अंतराराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत. यावेळी अंकिता नवघरे हिचे पेंटिंग बघून श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब नि अंकिता हिचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments