विवीध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये प्रस्थापिताची हिटलरशाही?

 


विवीध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये प्रस्थापिताची हिटलरशाही?

राजकारण : १

प्रा.महेश पाणसे 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद,नगरपरिषदा व पाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे.दुसऱ्या व तिसऱ्या फळीचे नेते हायकमानपुढे लोटांगण घालून आरती करतांना दिसू लागले आहेत.आपापल्या  धंद्यात मालदार असलेल्या पाटील,सावकार,शेठजींना "मुहदिखाई" साठी नेत्यांच्या बाजूला आसनस्थ करणे सुरू झाले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या फळीचे नेते खऱ्या शेतकऱ्यांना लाथाडून विवीध कार्यकारी सहकारी सोसायटयांवर आपल्या चेलेचपाटयांना चुपचाप घुसखोरी करून आपली पोळी शेकण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

      इथून बाजार समित्या व सहकारी बँकेची मक्तेदारी सांभाळण्याचा नेत्यांचा मनसुभा राहणार आहे.जिल्हयात जवळपास सर्व विधानसभा क्षेत्रात प्रस्थापित याकामी लागले आहेत.  ज्या नेत्यांमध्ये विधानसभा लढण्याची धमक नाही असले नेते आपल्या स्थानिक हिटलरशाही च्या जोरावर  हा फंडा वापरीत असतात.तालुक्यातील बिटस्तरावर असलेल्या विवीध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये निवडणुका कशा होतात?केव्हा होतात? याद्या प्रसिद्ध होतात की नाही? निवडणूक कार्यक्रम केव्हा? या संबंधाने बरीच माहिती जगजाहीर होताना दिसत नाही. किंबहुना प्रस्थापितांद्धारे होऊच दिली जात नाही. व या हज़ारों शेतकरी बांधवांना अगदी अंधारात ठेवून सोईच्या लोकांची वणीं लावली जाते.यातून पुढे बाजार समिती व जिल्हा सहकारी बँकेवर नेते स्वताला पुढे करतात.

मूल व नागभिड तालुक्यातील विवीध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचे शेतकरी  विरोधी हिटलरलाही राजकारण ही नवी बाब नाही.अनेकांची ओरड आहे. या सहकारी सोसायटयांचे व्यवस्थापक प्रस्थापिताच्या राजकारणात हातभार लावताना दिसतात. स्थानिक आमदार,नेते आपल्या अनेक  पिलांटूंना सहकारी सोसायट्या व बाजार समितीत रोजगार देवून सहपाठी तयार करताना दिसतात.

नगरपरिषद, पंचायत समिती,बाजार समिती या पाठोपाठ विवीध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना बसविणे हा राजकारणाचा फंडा असेलही,मात्र हजारो शेतकरी बांधवाना अंधारात ठेवून,निवडणूक प़क़ियेपासून वंचीत ठेवून विवीध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये बेमालूम शिरकाव हा भामटेगिरीचाच प्रकार असे अनेक जाणकार बोलतात.

Post a Comment

0 Comments