ऑस्ट्रेलियाचा महान असा सर्वश्रेष्ठ फिरकी गोलंदाज शेन वार्न यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

 


 ऑस्ट्रेलियाचा महान असा सर्वश्रेष्ठ फिरकी गोलंदाज शेन वार्न यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

◾क्रिकेट विश्व हादरले !

वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर ) : क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार शेन वॉर्न याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि सर्वकालीन महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. वॉर्नच्या व्यवस्थापकांनी एक संक्षिप्त विधान प्रसिद्ध केले आहे. ज्यात, 'थायलंडमधील कोह सामुई येथे शेन वॉर्नचे निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आला.' असे निवेदनात म्हटले आहे. 'शेन वॉर्न अटॅक आल्याने घरामध्येच पडला होता. वैद्यकीय कर्मचारी आणि स्टाफने त्याच्यावर घरातच उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वॉर्नने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. वैद्यकीय कर्मचार्‍यांनी सर्वोत्तम प्रयत्न करुनही त्याला वाचवता आले नाही.' असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात वीरेंद्र सेहवाग यांनी शेन वार्न या निधनावर प्रतिक्रिया देताना म्हंटल की " मला यावर विश्वासच बसत नाही की जगातील सर्वकालीक असलेला श्रेष्ठतम फिरकी गोलंदाज आज आपल्याला या जगातून सोंडून निघून गेला."

Post a Comment

0 Comments