चंद्रपूर सह राज्यातील १४ जिल्हे कोरोनाच्या निर्बंधातून पूर्णपणे मुक्त

 



चंद्रपूर सह राज्यातील १४ जिल्हे कोरोनाच्या निर्बंधातून पूर्णपणे मुक्त 

 ◾राज्य सरकारकडून निर्देश जारी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असताना राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांबाबत मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे निर्बंधमुक्त करण्यात आल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील कोरोनोचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यासरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाल आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेली नियमावली 4 मार्चपासून लागू होणार आहे. 

शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क आदी ठिकाणे १०० क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेची अट कायम राहणार आहे. शिथिलता देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या कार्यालयांना देखील पूर्ण क्षमतेनं काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी विभाग वा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील. अंगणवाडी आणि शिशुगटांचे वर्ग देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून शिथिलता देण्यात आलेल्या अ वर्गातील जिल्ह्यांसाठी १ डोस ९० टक्के पूर्ण, २ डोस ७० टक्के, पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांहून कमी, ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांहून कमी या निकषांवर शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना १०० टक्के निर्बंध मुक्त करण्यात आले असून, याठिकाणी सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क आदी ठिकाणे १०० क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अ श्रेणीमध्ये येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी १०० टक्के क्षमतेने कामकाज करण्याची मुभा देण्यात आली असून, शिथिलता न देण्यात आलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये ही क्षमता ५० टक्के असणार आहे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मागील महिन्याभरात मोठी घट झाल्याने सार्वजनिक निर्बंध लकवरच शिथील होणार असल्याची माहिती राज्य सरकारमार्फत देण्यात आली होती. तसेच लागू करण्यात आलेली जमावबंदी आणि मोठ्या कार्यक्रमांवरील मर्यादांवरील निर्बंध शिथील केले जाऊ शकतात असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता राज्य सरकारकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील १४ जिल्ह्यांना १०० टक्के निर्बंध मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments