महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अधिवेशन 24 एप्रिल ला.

  


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार  संघाचे विदर्भ अधिवेशन 24 एप्रिल ला.

 ◾सर्व पदाधिकारी यांनी अधिवेशन यशस्वी करण्यास सज्ज व्हावे - प्रा.महेश पानसे

नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ पदाधिकारी अधिवेशन नागपूर नगरीत उत्साहात पार पढणार असून विदर्भातील  सर्व पदाधिकारी यांनी हे भव्य अधिवेशन यशस्वी करण्यात आपली भूमिका पार पाडावी असे आवाहन पुंंव विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी नागपूर येथे आयोजीत विदर्भातील पदाधिकारी यांचे आढावा बैठकीत केले. संघटनेच्या नागपूर जिल्हा कार्यालयात  आयोजीत या आढावा बैठकीला विदभॉतील ११ जिल्हयांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सभेचे प्रास्तावीक विदर्भ उपाध्यक्ष प्रदिप रामटेके यांनी करुन होऊ घातलेल्या पदाधिकारी अधिवेशन संबंधाने  सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी विवीध विषयांवर आपली मते मांडली. रखज्य पत्रकार संघाचे परंपरेनुरूप अधिवेशन यशस्वी करण्याची महत्वाकांक्षा पदाधिकारी यांनी व्यक्त केली.

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी अधिवेशन यशस्वी करण्यासंबंधाने प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला. सदर विदर्भ अधिवेशन दुसरे विदर्भ अधिवेशन असून प्रथम अधिवेशन चंद्रपूर जिल्हयातना. विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले होते. संपन्न झाले होते.

एप्रिल 24 ला नागपूर ला होणाऱ्या अधिवेशनाला राज्य संघाचे अध्यक्ष. मा. वसंत मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांचे सह संपुर्ण  राज्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय केंद्रीय  मंत्री, राज्याचे मंत्री हजर राहणार असल्याचे विदर्भ संघटक आनंद शर्मा यांनी यावेळी सागितले.

           या आढावा सभेत प्रा. महेश पानसे यांचेसह विदर्भ उपाध्यक्ष प्रदिप रामटेके,अनुपजी भागंव,विनायकराव ईंगळे ,सरचिटणीस शरद नागदेवे,संघटक आनंद शर्मा, अमरावती विभाग प्रमुख सिध्दार्थ तायडे,जिल्हाध्यक्ष नागपूर प्रदिप शेंडे,चंद़पूर सुनिल बोकडे,अमरावती नयन मोंढे,भंडारा सदाशिव ढेंगे,गडचिरोली ईरफान खान, वार्ध प्रमोद पाणबुडे,नागपूर जिल्हयातील तालुका अध्यक्ष, नागपूर शहर पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे नियोजन प्रदिप शेंडे यांचे नेतृत्वात करण्यात आले होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments