( WCL ) वेकोलीच्या विरोधात राजुरा तालुका रामपूर वासीयांचे उद्या एक दिवसाचे धरणे आंदोलन


( WCL ) वेकोलीच्या विरोधात राजुरा तालुका  रामपूर वासीयांचे उद्या एक दिवसाचे धरणे आंदोलन

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : रामपूरवासीं नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेकोली विरोधात उद्या ३ फरवरी ला एक दिवसाचे धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रामपूर येथील सरपंच वंदना गौरकर यांनी केले आहे. यासंदर्भात रामपूर वासियांनी अनेकदा निवेदन देऊन वेकोलीचे लक्ष वेधले आहे. पण अधिकारी वर्ग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत.यामुळं जनतेत रोष निर्माण होत आहे वेकोली प्रशासनाने पुनर्वसन रामपूर वासीयांना हक्काचे पट्टे मिळणे, गावातील रस्ते नाल्या मुख्य चौकाचे सौन्दर्यीकरण करणे, रामपूर झोपडपट्टी वासीयांना घरकुल  योजनेचा लाभ मिळवून देणे, यासाठी पुनर्वसित वस्ती व खाली असलेली जागा ग्रामपंचायत रामपूर ला हस्तांतरीत करणे, रामपूर येथे बहुतांश कामगार व प्रकल्पग्रस्त राहत असल्यामुळं बल्लारपूर क्षेत्र वेकोली द्वारा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिवर्षं १ कोटींचा सीएसआर फंड उपलब्ध करून द्यावा तसेच धोपटाला ते रामपूर टी-पॉईंट आणि रामपूर टी-पॉईंट ते माता मंदिर पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड डीवायडर सह तसेच पथदिवे लावणे ई मागण्याची पूर्तता करण्यासाठी उद्या दिनांक ३ फरवरी २०२२ ला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे याकरिता गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रामपूर गावातील सरपंच वंदना गौरकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments