बल्लारपूर नगर परिषद तर्फे प्रत्येक प्रभागात R.O प्लांट लवकरात लवकर दुरुस्ती करून सुरू करण्यात यावे - कार्याध्यक्ष राकेश सोमानी

 



बल्लारपूर नगर परिषद तर्फे प्रत्येक प्रभागात R.O प्लांट लवकरात लवकर दुरुस्ती करून सुरू करण्यात यावे - कार्याध्यक्ष राकेश सोमानी

◾नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे याचा कडे निवेदना मार्फत मागणी

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर नगर परिषद तर्फे प्रत्येक प्रभागात R.O प्लांट लावण्यात आले परंतु काही प्रभागात प्लांट दुरुस्ती करण्यात आले नाही व प्रत्येक प्रभागांमध्ये नागरिकांना या सुविधाचा लाभ घेता येत नाही मनून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे याचा कडे निवेदना मार्फत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी व सदस्य यांनी मागणी करण्यात आली व क्षणाचाही विलंब न करता नगरविकास राज्यमंत्री साहेबांनी मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर यांना सूचना केल्या व लवकरच हे R.O प्लांट दुरुस्ती करून नागरिकांच्या सेवांमध्ये रुजू होतील असे आश्वासन मुख्याधिकारी साहेब यांनी दिले . यावेळी प्रामुख्याने उपस्थित शहराध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष राकेश सोमानी, जिल्हा महासचिव आदित्य शिंगाडे,सुमित डोहने सदस्य संजय गांधी निराधार योजना बल्लारपुर, इम्रान खान, अंकित निवलकर, निलेश गायकवाड, संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments