मायलेकीवर शस्त्राने हल्ला, आईचा मृत्यू तर १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी

  



मायलेकीवर शस्त्राने हल्ला, आईचा मृत्यू तर १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी 

◾बीडमध्ये दिवसाढवळ्या रक्तपात !

वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर ) : मागील काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यात हत्येच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसात बीडमध्ये हत्येच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता परळी शहरातून एक थरारक घटना समोर आली आहे. परळी शहरातील रहिवासी असणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तर १६ वर्षीय मुलीवर देखील वार करून तिला रक्तबंबाळ करण्यात आलं आहे.या घटनेची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली? याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. लवकरच या हत्येचं गूढ उलगडण्याची शक्यता आहे. आर्थिक कारणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. शेख मदिना शेख मंजीद असं हत्या झालेल्या ५० वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या परळी शहरातील आयेशा नगर परिसरात वास्तव्याला होत्या. आरोपीनं मदिना यांची १६ वर्षीय मुलगी मुस्कान हिच्यावर देखील चाकुने वार केले आहेत. या हल्ल्यात तिही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस येताच पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.  ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

पण आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. परळी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांत खुनाची ही तिसरी घटना घडली आहे. त्यामुळे परळीत नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



Post a Comment

0 Comments