शिवजयंतीच्या पर्वावर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये मार्गदर्शक सभा

 



शिवजयंतीच्या पर्वावर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये मार्गदर्शक सभा

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर )  : रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फरवरी ला जयंती २ वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित प्रमाणात साजरी करण्यात आली होती यावर्षीही शिवजयंती चा उत्सव पार पाडतांना बल्लारपूर शहरातील शांतता कायम राखण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग पसरू नये याकरिता कोणत्या उपाययोजना कराव्या यानुषणगाने शिवजयंती चे आयोजन करणाऱ्या समितीची बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये मार्गदर्शक सभा पार पडली या सभेत पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी काही सूचना दिल्या कोरोना विषाणूचा संक्रमण अजूनही संपलेला नाही त्यामुळे उत्सव प्रसंगी गर्दी करणे टाळावी. प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणूक काढू नये छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक वा फोटोला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करावे. तसेच शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबीर, आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांनी केले.


Post a Comment

0 Comments