राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर




राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर  

◾निवडणुका एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता !

मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त होत आहे. यांमुळे लवकरच राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळेल यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार आज राज्य निवडणूक आयोगाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून नगरपालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाचा घटक असणाऱ्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे कोरोना संक्रमण काळात मार्च २०२० ते डिसेंम्बर २०२१ पर्यंत राज्यातील अनेक नगरपालिकाच्या निवडणुका प्रलंबित आहे मध्यतरी कोरोना प्रकोप कमी झाला असतांना सदर निवडणुका पार पडतील अशी शक्यता होती मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्यामुळं निवडणुका पुढे ढकलण्यात येतील अशी स्थिती होती मात्र आयोगाने आहे त्याच स्थितीत नगरपंचायतीच्या निवडणुका पार पाडल्या.

         राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्यातील अ, ब व क वर्गात येणाऱ्या नगरपालिका निवडणुका साठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यानुसार अ वर्ग नगरपालिकांचे मुख्याधिकारी २ मार्च पर्यंत प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असून निवडणूक आयोग याला ७ मार्च ला मान्यता देईल यावर १० ते १७ मार्च दरम्यान आक्षेप व हरकती घेता येईल २२ मार्च ला यावर सुनावणी होईल व जिल्हाधिकारी याला २५ मार्च रोजी आयोगाकडे पाठवतील तर १ एप्रिल २०२२ ला अंतिम प्रभागरचनेला मान्यता मिळेल व ५ एप्रिल ला अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. दरम्यान ब व क वर्गातील नगरपालिकासाठी हाच कार्यक्रम असून यात पहिल्यांदा राज्य निवडणूक आयोगाकडे नव्हे तर संबंधित जिल्हाधिकारी यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत.म्हणजे निवडणूक होणाऱ्या नगरपालिकाचे मुख्याधिकारी संबंधित जिल्हाधिकारी २ मार्चपर्यंत प्रस्ताव पाठवतील म्हणजे यापुढील सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी जाहीर करतील व या नगरपालिकांच्या निवडणुका एप्रिल २०२२ चा शेवटचा आठवडा किंवा मे २०२२ च्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments