वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार : वाघासह पसरतेय अस्वलाची दहशत मादी अस्वल आपल्या पिलासह फिरतेय

  



वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार : वाघासह पसरतेय अस्वलाची दहशत मादी अस्वल आपल्या पिलासह फिरतेय

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरात एका मादी अस्वलाची दहशत पसरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून एक मादी अस्वल आपल्या एका पिल्लाला घेऊन वडगाव परिसरातील आंबेडकर सभागृह मार्गावरील शिव नगरात रोज संध्याकाळी फिरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोज ते अस्वल रात्री 8 ते 10 वाजताच्या सुमारास या परिसरातून आपल्या पिल्लासह मुक्त संचार करत आहे. या मादी अस्वलाचे छायाचित्र कॅमेरामध्ये कैद झालं आहे. घटनेची माहिती वडगाव परिसरातील नगरसेवक पप्पू देशमुख यांना देण्यात आली.

माहिती मिळताच देशमुख यांनी वनविभागाला घटनास्थळी बोलावून अस्वलाला तिथून पळवून लावण्यात आलं आणि वन विभागाला या परिसरात रोज गस्त करण्याची विनंती केली. तसेच परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments