कराडच्या ३२ शिक्षकांची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट

 



कराडच्या ३२ शिक्षकांची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट



चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाची सोय करून पटसंख्या वाढविणाऱ्या चंद्रपूर महापालिकेच्या शाळा आदर्श ठरू लागल्या आहेत. हा उपक्रमशील प्रयोग बघण्यासाठी कराड येथील शिक्षकाचे एक शिष्टमंडळ २८ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरात आले होते. कराड नगर परीषद शाळा क्रमांक ३ येथील प्रयोगशील मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वात ३२ शिक्षक- शिक्षिकानी चंद्रपूर महानगरपालिकेच्या भिवापूर, बाबुपेठ आणि अष्टभुजा येथील शाळा भेटी दिल्या. चंद्रपूर मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करीत सविस्तर माहिती दिली. शिष्टमंडळाने सावित्रीबाई फुले शाळा, शहिद भगतसिंग शाळा, भारतरत्न डाॅ.आंबेडकर शाळा आदी शाळेला भेटी देऊन शैक्षणिक कार्यांची माहिती घेतली.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांच्या भिंती बोलक्या आहेत. बसण्याची व्यवस्था नेटकी. पिण्याचं स्वच्छ पाणी, अग्निशमन बंब, पंखे आहेत. महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि तेलगु शाळा शहरात सुरू आहेत. या शाळेत डिजीटल पद्धतीने शिक्षण सुरु केल्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण 29 शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तीन शाळांत तेलुगु, तीनमध्ये हिंदी, दोनमध्ये उर्दू शिक्षण दिलं जात असून, 21 शाळांत मराठी-सेमी इंग्रजी शिकवलं जातं. यात सोळा शाळांमध्ये नर्सरी, केजीचं शिक्षणसुद्धा दिलं जात आहे.

Post a Comment

0 Comments