भीषण अपघातात चालक घटनास्थळी ठार

 



भीषण अपघातात चालक घटनास्थळी ठार 

 ◾कंटेनर भरधाव वेगाने येवून कन्टेनरला धडकली 

◾डुलकी येणे ठरले अपघातास कारणीभूत 

वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : मुंबई नागपूर नॅशनल हायवे नागठाना रोडवर अग्निहोत्री काॅलेज जवळपास रात्री १२ वाजता सुमारास WB-11-D-8672 हा कन्टेनर ओरीसाला जात असताना त्यांच्या मागचा डावा टायर फुटल्याने गाडी रोडच्या एका बाजुने थांबली असता पहाटे ४:३० च्या सुमारास मागून येणारी आयशर MH-04-KF-0539 ही भरधाव वेगाने येवून कन्टेनर धडकली यात आयशरच्या कॅबीन मध्ये असलेल्या ड्रॉव्हवर हा जागीच मरण पावला.

आयशर गाडी क़मांक MH- 04- KF- 0539 मधील मृतक ड्रॉव्हवर नामे सुभाष वर्मा राहणार जोनपुर, उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम बुटीबोरी जिल्हा नागपूर हा कंटेनर चालवित होता तर सोबतचा दुसरा ड्रॉव्हवर ब्रीजेश यादव हा कॅबिनमध्ये झोपून होता. तो सध्या ठीक आहे कन्टेनर ड्रॉव्हवर दिपक महंतो राहणार हाजीपुर राज्य बिहार कंडक्टर मिताई साहू रा. कलकत्ता हे दोघेही व्यक्ती सुखरूप आहेत सध्या कलम 279, 304, R IPC अन्वये गुन्हा नोंद करुन मृतकाचे पार्थिव शवविच्छेदन साठी सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आली आहे असून व पुढील तपास सांवगी पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जळक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामदास बिसने, हेड कॉन्स्टेबल विजय पंचटीके, संजय चाटे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, प्रविण बोबडे नायक पोलिस कॉन्स्टेबल, अमोल वानखेडे, प्रशांत वंजारी, पोलिस शिपाई श्रावण पवार, स्वप्नील वंजारी ईत्यादी पोलिस अधिकारी व कर्मचारी जागेवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments