कौटुंबिक वादातून भाऊजीनी केला साळ्याचा खून

 






कौटुंबिक वादातून भाऊजीनी केला साळ्याचा खून  

◾चंद्रपूर शहरातील डॉ.आंबेडकर प्रभागातील धक्कादायक घटना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) चंद्रपूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभागातील  आज १५ फरवरी ची सकाळ दहशतीच्या सावटाखाली उजळली की काय असा प्रश्न या परिसरातील नागरीक करू लागले या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार चंद्रपूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभागात शुभम राजू एतमवार ( २५ ) रा.श्रीराम वार्ड बल्लारपूर आपल्या पत्नीसह वास्तव्यास असतांना प्रथमेश बंडू निमगडे ( १९ ) साळा यांचे आपले बहिणीच्या घरी जाणे-येणे सुरू होते या संदर्भात विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार मृतकाने आपल्या बहिणी कडून आर्थिक बाबीतून वाद झाला असावा व या वादातूनच आरोपी शुभम ने प्रथमेश बंडू निमघडे यांची निघृन पणे हत्या केल्याची चर्चा या परिसरात चर्चिली जात आहे सदर हत्येची माहिती रामनगर पोलिसांना कळताच रामनगर च्या डीबी पथकाने आरोपीला लगेच अटक केली याविषयीचा अधिक तपास श्री.राजेश मुळे साहेब पोलीस निरीक्षक रामनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बोपाले करीत आहेत व लवकरच या हत्येचे गूढ उकलले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments