काळोखाचा फायदा घेत एका नराधमाने केला ३ मुलींवर लैंगिक अत्याचार !

 



काळोखाचा फायदा घेत एका नराधमाने केला ३ मुलींवर लैंगिक अत्याचार !

वर्धा ( राज्य रिपोर्टर ) :  वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका नराधमाने तीन अल्पवयीन मुलींसोबत अत्याचाराची परिसीमा गाठली आहे. विकृताने काळोखाचा फायदा घेत दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. भेदरलेल्या अवस्थेतील बहिणींनी या संतापजनक घटनेची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. यानंतर पालकांनी थेट गिरड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. केशव बावसू वानखेडे असे अटक केलेल्या ३६ वर्षीय विकृताचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील माकुना सावळी येथील रहिवासी आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा सविस्तर तपास गिरड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिपे विक्रीचे काम करतो. विविध गावांत जाऊन तो लोखंडी पिपे विकायचा. अशातच तो गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात दाखल झाला. गावातील रस्त्याकडेला थांबून तो पिपे विकायचा. दरम्यान त्याची नजर सहा वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींवर पडली. नराधमाने काळोखाचा फायदा घेत अल्पवयीन मुलींना जवळच रस्त्याकडेला असलेल्या एका ओसाड जागेवरील बाथरुममध्ये घेऊन गेला.

याठिकाणी विकृताने दोन्ही सख्ख्या बहिणींचे लैंगिक शोषण केले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अन्य एका सात वर्षीय मुलीला देखील वासनेचा शिकार बनवले आहे. ३६ वर्षीय नराधम केशव वानखेडे याने तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेने वर्धा जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरा बसला आहे. दोन्ही बहिणींनी ही संतापजनक घटना आपल्या आई वडिलांना सांगितल्यानंतर सर्व प्रकार उजेडात आला. शिवाय नराधमाने अन्य एका चिमुकलीवर बलात्कार केल्याचं देखील उघड झालं. पोलिसांनी आरोपी केशव बावसू वानखेडे याला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

Post a Comment

0 Comments