बल्लारपूर विसापूर टोल नाक्यावर ओवरलोड ट्रकच्या नावावर अवैध वसुलीचा ट्रक चालकांचा आरोप

 





बल्लारपूर  विसापूर टोल नाक्यावर ओवरलोड ट्रकच्या नावावर अवैध वसुलीचा ट्रक चालकांचा आरोप 

◾परराज्यातील ट्रकचालक यांच्याकडून अवैध वसुली

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर चंद्रपूर मार्गावर विसापूर टोल नाक्यावर ओव्हरलोड च्या नावाखाली अवैध वसुली करत असल्याचा आरोप ट्रक चालकांनी केला आहे यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहिती नुसार बल्लारपूर मार्गावरील विसापूर टोलनाक्यावर रात्रीच्या सुमारास परराज्यातील ट्रकचालक यांच्याकडून अवैध वसुली करीत असल्याची तक्रार केली यांच्या माहितीनुसार देशभरातील अनेक टोल नाक्यावर टोल ची रीतसर पावती दिली जाते मात्र विसापूर टोल नाक्यावर काटा खराब असल्याच्या कारनावरून ट्रक ओव्हरलोड असल्याचे सांगून प्रति ट्रक चालकाकडून २०० ते ३०० रु अधिकचे वसूल करण्यात येतात याविषयी काही ट्रक चालक व टोल चालक यांच्यात शाब्दिक वाद ही निर्माण झाला ट्रक चालकाच्या माहितीनुसार टोल काटा खराब असल्यामुळे अधिकची वसुली करण्यात येते जर कुणी ट्रकचालकांनी टोल देण्यास नकार दिला तर ट्रकाना विनाकारण ३ ते ४ तास अडवून ठेवले जाते तसेच ट्रक अंडरलोड असले तरी ओव्हरलोड असल्याचे कारण सांगून अधिकची वसुली करण्यात येते याविषयी शनिवारी रात्रीच्या सुमारास आंध्रप्रदेश राज्यातील ट्रकचालकाने सदर प्रकार उघडकीस आणला यावेळी त्याने आपला ट्रक टोल काट्यावर नेला असता वजन काट्यात तफावत दिसून आल्याची माहिती आहे यावेळी ट्रकचालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तेजिंदरसिंग दारी व टोल नाक्याचे कर्मचारी होते.



Post a Comment

0 Comments