भिक्षु निवास पाली विद्यालय बुध्द विहार बल्लारपूर च्या वतीने बाल धम्मवर्गातील विद्यार्थ्याची एकदिवसीय धम्म सहल

 



भिक्षु निवास पाली विद्यालय बुध्द विहार बल्लारपूर च्या वतीने बाल धम्मवर्गातील विद्यार्थ्याची एकदिवसीय धम्म सहल  

◾भद्रावतीतील विजासन लेणी व चंद्रपुरातील ऐतिहासिक दिक्षाभूमीला भेट

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : त्रिरत्न बौद्ध महासंघ द्वारा आयोजित भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर येथे नियमित होत असलेल्या बाल  धम्मवर्गातील विद्यार्थ्यांची सहल दि. १९ फेब्रू. ला आयोजित करण्यात आली होती. भद्रावती येथील विज्जासनची ऐतिहासिक बुद्ध लेणी येथे भेट देण्यात आली. याप्रसंगी त्रिशरण पंचशील विधायक शील  बुद्ध पूजा घेण्यात आली व ध्यान सराव करण्यात आला. यानिमित्य काढ़ण्यात आलेल्या रैली ने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते. दोन बस द्वारे एकंदर ११० विद्यार्थी व सहकारी सम्मिलित झाल होते विजासन लेणीच्या भेटीनंतर चंद्रपुर १६ ऑक्टोम्बर १९५६ ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेल्या दीक्षाभूमिला भेट देन्यात आली.  याप्रसंगी त्रिशरण पंचशील विधायक शील व नंतर अर्पण विधि घेण्यात आली व मैत्री गीताने शेवट करण्यात आला. याप्रसंगी धम्ममीत्र शैलेंद्र शेंडे यानी मार्गदर्शन केले. ही सहल यशस्वी करण्याकरिता भास्कर भगत, संपत कोरडे, जयदास भगत, अशोक दुपारे, अंबादास मानकर, संगम धोपटे, गोकुल वाघमारे, रसिका वाघमारे, संगीता घोटेकर, नीता कोरड़े, करुणा भगत, विद्या भगत यानी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments