धक्कादायक घटना ! आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने डोक्यात गोळी घालून केली आत्महत्या

 



धक्कादायक घटना ! आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने डोक्यात गोळी घालून केली आत्महत्या

गडचिरोली ( राज्य रिपोर्टर ) : अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे सुरक्षारक्षक प्रमोद शेकोकर यांनी काल २० फरवरीच्या रात्री ९:०० वाजताच्या दरम्यान आपल्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आहे. या संदर्भातील अधिक माहितीनुसार प्रमोद शेकोकर हा पोलीस शिपाई अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलॉनी मध्ये आपल्या अपार्टमेंट मध्ये रात्री ९:०० वाजताच्या दरम्यान स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडली या आवाजामुळे परिसरातील व्यक्तींनी गर्दी केली या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्यासह पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. विशेष म्हणजे पोलीस शिपायाची पत्नी सुध्दा पोलीस विभागात कार्यरत असून ती ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहे. नेमकं कोणत्या कारनामुळं या पोलीस शिपायाने आत्महत्या केली हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments