धक्कादायक घटना भर चौकात तरुणांची हत्या : घुग्घुस शहर हादरले

 



धक्कादायक घटना  भर चौकात तरुणांची हत्या : घुग्घुस  शहर हादरले

घुग्घुस ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यात काल १९ फरवरी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह असतांना दुसरी कडे एका तरुणांचा गळा भर चौकात कापण्यात आल्याची धक्कादायक घटना घुग्घुस शहरात काल रात्री १०:३० ते ११:०० वाजताच्या दरम्यान बँक ऑफ इंडिया समोर २५ वर्षीय कादर शेख या तरुणांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत काही अज्ञात तरुणांनी हल्ला चढविला सदर तरुण जमिनीवर पडला असता मारेकऱ्यांनी त्याच्या गळ्यावर वार करीत ठार केल्याच वृत्त आहे मृतक कादर हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता तसेच त्याच्यावर खून मध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बँक ऑफ इंडिया समोर कादर ने हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला होता. नेमकं सदर हत्याकांडाच कारण काय? कादर चे मारेकरी कोण याचा तपास घुग्घुस पोलीस करत आहे. ऐन शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशीच अशा प्रकारची हत्या करून पोलिसांना एक प्रकारे आवाहन देण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न आहे की काय? ज्या ठिकाणी कादर ने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी असा त्याचा दुःखद अंत करण्यात आला सदर हत्येची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास घुग्घुस पोलीस करत आहेत.

Post a Comment

1 Comments

  1. Yah news me shabdo ka chayan barobar nahi h .....pls dhyan de ... News par

    ReplyDelete