अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीचालक ठार

  


अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीचालक ठार  

◾दुचाकी चालक नांदेडचा असल्याचा अंदाज !

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर मुल महामार्गावरील लोहारा गावाजवळील लोहारा सावजी धाब्यजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. बजाज पल्सर MH 26 BV 2155 या दुचाकीने प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला. वाहनाची इतकी जबर धडक होती की युवकाच्या मेंदूचे तुकडे उडाले. रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अपघातात मृत्यू पावलेला तरुण नांदेड येथील असल्याचे बोलले जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


Post a Comment

0 Comments