बल्लारशाह रेलवे स्थानकात रेल्वे पिटलाईनचे काम लवकरच पूर्णत्वास


बल्लारशाह रेलवे स्थानकात रेल्वे पिटलाईनचे काम लवकरच पूर्णत्वास

◾अनेक नवीन गाडया आणि गाडयाचे विस्तार मिळून फार मोठी सुविधा उपलब्ध होणार - हंसराज अहिर

◾माजी केन्द्रीय मंत्री हंसराज अहिर यांची पिटलाईन ( थर्ड लाईन ) च्या कामाची प्रत्यक्ष भेट 


बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लाशाह परिसरातील रेलवे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी केन्द्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रयत्नाने  बल्लारशाह रेलवे स्थानकात रेल्वे पिटलाईनचे काम पूर्ण होत आहे. या पिट लाईन कामाच्या पाहणीसाठी त्यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन यावेळी कामाच्या प्रगतिबाबत पाहणी करून काम तातडीने पूर्ण व्हावे अशा सूचना हंसराज अहिर केल्या. यावेळी बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे अधिकारी यांनी कामाच्या प्रगतिबाबत माहिती देते काम तातडीने पूर्ण होईल या बाबत आश्वस्त केले. या लाइनमुळे यापुढे बल्लारशाह, चंद्रपूर मार्गे थेट मुंबई, दिल्ली, कोलकत्ता व अन्य मेट्रो शहरांकडे रेल्वे गाड्या सुरु होणार. या पिटलाईनमुळे बल्लारशा रेल्वे स्थानकाचे वैभव वाढेल, हे फार महत्वाचे व महत्वाकांक्षी काम पूर्णत्वाकडे येत असल्याने आनंद व्यक्त केला. या लाईनचा अभाव असल्याने यापूर्वी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पाठपुरावा करून मेट्रो शहराकडे काझीपेठ वरून गाड्या सोडण्याची व्यवस्था केली होती.

बल्लारशाह येथील पिटलाईनचे भविष्यात लवकरच लोकार्पण झाल्यास या परिसरातील रेलवे प्रवाशांना अनेक नवीन गाडया आणि गाडयाचे विस्तार मिळून फार मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी हंसराज अहिर यांनी सांगितले. 

 जिले ची रेल्वेच्या समस्यांचे संदर्भात रेल्वे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क आहेत. रेल्वे प्रवासी समस्यांना मार्गी लावण्याच्या प्रयत्न करत आहेत. बल्लारशाह रेलवे स्टेशनवर पिटलाईन निरीक्षणाच्या वेळी अहीर सोबत महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री , जेडआरयूसीसी श्रीनिवास सूंचूवार , डीआरयूसीसी सदस्य विकास राजुकर,प्रशांतभोरे,शाम सारदा,अनीश दीक्षित,प्रल्हाद शर्मा ,प्रमोद त्रिवेदी, प्रदीप माहेश्वरी,गौतम यादव,पूनम तिवारी ,देवा वाटकर, रामेश्वर पासवान , रेलवे अधिकारी एयू. खान स्टेशन अधिक्षक, जे. जे. राजूकर रेलवे अधिकारी आरपीएफ मिश्रा आदि उपस्थित होते.



Post a Comment

1 Comments

  1. Find the best games & casino apps in India 2021 - DRMCD
    Best Indian 세종특별자치 출장마사지 casino apps for 남원 출장안마 Indian players 2021 - Check the best Indian online 강원도 출장안마 casinos ⚽ Play Slots, 충청남도 출장마사지 Blackjack, 김해 출장샵 Poker, Roulette & more for Fun!

    ReplyDelete